पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापुरात; पंधरा हजार घरकुलांचे करणार वाटप

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 18, 2024 16:41 IST2024-01-18T16:40:10+5:302024-01-18T16:41:14+5:30

एकूण त्यांचा दौरा दीड तासांचा आहे.

pm narendra modi in solapur tomorrow fifteen thousand houses will be distributed | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापुरात; पंधरा हजार घरकुलांचे करणार वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापुरात; पंधरा हजार घरकुलांचे करणार वाटप

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी, १९ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी साडेदहा वाजता कुंभारी येथील 'रे नगर'च्या 'हेलीपॅड'वर त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर वृक्षारोपण, रे नगर मॉडेल हाऊसची पाहणी, विडी कामगारांशी संवाद, त्यानंतर घरकुलांचे वाटप त्यांच्या हस्ते होणार आहे.

एकूण त्यांचा दौरा दीड तासांचा आहे. याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच राज्यपाल आदी उपस्थित राहणार आहेत. सोलापुरी चादरी, हातमागावर विणलेली शाल, तसेच फेटा देऊन मोदींचा रे नगर प्रकल्प समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

Web Title: pm narendra modi in solapur tomorrow fifteen thousand houses will be distributed