शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

'मतदान कोणालाही करा, मी शिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:20 IST

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याचे वाटप व पाण्याच्या टाकीचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर : मी येथे तुमची मते मागायला आलेलो नाही, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, मतदान कोठेही करा असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेची सामाजिक बांधिलकी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आलो असुन, दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शिवसेनेचं नाव घ्या. शिवसेना तुमच्या सेवेसाठी सज्ज राहील, असा आत्मविश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याचे वाटप व पाण्याच्या टाकीचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, सेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अस्मिता गायकवाड, शैला स्वामी, जि.प सदस्या शैला गोडसे, पोखरापूर पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, पुष्कराज पाटील आदी उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोहोळ तालुका शिवसेनेच्यावतीने सारोळे येथे धावता दौरा आयोजित केला होता. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाबाबत विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांनी मला ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळी भागाचा दौरा करुन शिवसेनेच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मदत करण्यासाठी पाठविल्याचे सांगितले.

या भेटीत प्रारंभी पोखरापूर येथील तलावास भेट देऊन परिसरातील पाणी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. 1996 सालापासून पोखरापुर तळ्यात पाणी सोडावे या पाण्याच्या मागणीसाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत. अनेकजण आले गेले, परंतु प्रश्न मार्गी लागला नाही, आपण लक्ष घालावे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. तातडीने हा प्रश्न मार्गी न लागल्यास या पंचक्रोशीतील शेतकरी येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मतदान तुम्ही कोणालाही करा, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, याच्याशी काही संबंध नाही. तुमचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोनच दिवसांमध्ये मुंबईत जाऊन जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी काम मार्गी लावण्याचे आश्वासन आदित्य यांनी दिले.

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूर