शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

शहरातील तीन तर ग्रामीणमधील १६ केंद्रांवर विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षेचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 12:19 PM

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून 5 ऑक्टोबरपासून सुरु

ठळक मुद्देकोणत्या परीक्षा केंद्रांवर कोणकोणत्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि ट्विटरवर उपलब्ध असून संबंधित प्राचार्यांकडेही ती माहिती देण्यात आली आहे

सोलापूर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाकडून 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या अंतिम वर्ष, एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी करण्यात आली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. ऑफलाइनची परीक्षा शहरातील तीन केंद्रांवर तर ग्रामीण मधील 16 केंद्रांवर होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांची सोय संगमेश्वर महाविद्यालय, वसुंधरा महाविद्यालय आणि डी.बी. एफ. दयानंद महाविद्यालय येथील केंद्रांवर करण्यात आलेली आहे. तर ग्रामीण भागातील शिवाजी महाविद्यालय बार्शी, सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैराग, सी बी खेडगी  महाविद्यालय अक्कलकोट, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, सांगोला महाविद्यालय सांगोला, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ, बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते, के एन भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी, मारुतीराव महाडिक महाविद्यालय मोडनिंब, माऊली महाविद्यालय, वडाळा या 16 केंद्रांवर ऑफलाईन विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. 

परीक्षा केंद्रांची माहिती संकेतस्थळावरकोणत्या परीक्षा केंद्रांवर कोणकोणत्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि ट्विटरवर उपलब्ध असून संबंधित प्राचार्यांकडेही ती माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ऑफलाइन ऑप्शन निवडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ऑनलाइन परीक्षा देता येईलपरीक्षेसंदर्भात विद्यापीठाकडे ज्या विद्यार्थ्यांनी संमतीपत्र भरून दिले नाही अथवा ऑफलाईन परीक्षा देण्यास संमती दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. यासाठी अशा विद्यार्थ्यांना www.pahsu.org या पोर्टल वर जाऊन तिथे आपला ढफठ नंबर टाकून ाwww.pahsu.org हा पर्याय निवडायचा आहे. त्यांना मोबाईलवर पासवर्ड प्राप्त होईल. त्यानुसार त्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरuniversityविद्यापीठexamपरीक्षाSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर