उद्याच्या पाण्याचे नियोजन आजच करा; मोहोळमध्ये जलदिन प्रशिक्षणात सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:56+5:302021-03-24T04:20:56+5:30
या चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी विभागीय संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोरडवाहू शेतीमध्ये पाणी ...

उद्याच्या पाण्याचे नियोजन आजच करा; मोहोळमध्ये जलदिन प्रशिक्षणात सल्ला
या चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी विभागीय संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर होते.
त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोरडवाहू शेतीमध्ये पाणी वापराचे व संवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले.
डॉ. टी. आर. वळकुंडे यांनी जल दिनाचे महत्त्व व त्यानिमित्त लोकांमध्ये कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ च्या माध्यमातून करण्यात येत असलेली जागृती याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. सुहास उपाध्ये, सहाय्यक प्राध्यापक, मृदा व जलसंधारण विभाग यांनी उद्याच्या पाण्याचे नियोजन आजच कसे करतात येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाणलोट व्यवस्थापन, जमिनीची धूप इत्यादी विषयाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.
यावेळी डॉ. शरद जाधव , डॉ. दिनेश क्षिरसागर, डॉ. सुरज मिसाळ, सुयोग ठाकरे, नितीन बागल यांनी परिश्रम घेतले.