नव्या रस्त्यावर दीड महिन्यातच पडले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:22+5:302021-08-27T04:26:22+5:30

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी ते उपळाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यावर मागील एक ते दीड महिन्यातच या ठिकाणची ...

Pits fell on the new road in a month and a half | नव्या रस्त्यावर दीड महिन्यातच पडले खड्डे

नव्या रस्त्यावर दीड महिन्यातच पडले खड्डे

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी ते उपळाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यावर मागील एक ते दीड महिन्यातच या ठिकाणची कामे झाली आहेत, तर अद्यापही या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने या रस्त्याच्या कामाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करून कामाच्या चौकशीची मागणी दीपक गव्हाणे यांनी केली आहे.

सदरील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत, तर काही खड्ड्यांत मुरूम टाकण्याचे कामही करण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता असून, बांधकाम विभाग अपघाताची वाट बघतोय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सदरील कामाची चौकशी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

सदरील कामाची पाहणी करून तत्काळ रस्ता दुरुस्त करून घेणार असल्याची माहिती कुर्डूवाडीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता नझीर नाईकवाडी यांनी दिली.

Web Title: Pits fell on the new road in a month and a half