सोलापूरात धाडसी चोरी; २६ तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:10 IST2017-08-23T13:08:45+5:302017-08-23T13:10:51+5:30

सोलापूर दि २३ : पोलिसांची रात्री गस्त सुरु असतानाही चोरट्यांनी त्यांच्या हातावर तुरी देत पूर्व भागातील पद्मानगरमध्ये घर फोडून तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धाडसी चोरी करुन चोरट्यांनी पलायन केले.

Piracy in Solapur; 26 Tola gold lumpas | सोलापूरात धाडसी चोरी; २६ तोळे सोने लंपास

सोलापूरात धाडसी चोरी; २६ तोळे सोने लंपास

ठळक मुद्दे२६ तोळ्याचे दागिने व २१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदहँडड्रॉपची कडी सरकवून दरवाजा उघडला

आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : पोलिसांची रात्री गस्त सुरु असतानाही चोरट्यांनी त्यांच्या हातावर तुरी देत पूर्व भागातील पद्मानगरमध्ये घर फोडून तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धाडसी चोरी करुन चोरट्यांनी पलायन केले.
पूर्व भागातील पद्मानगरमध्ये राहणारे नागनाथ नारायण जक्का (वय- ७४) हे सोमवारच्या रात्री नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज आटोपून झोपी गेले. चोरट्यांनी  सेफ्टी लोखंडी दरवाजाच्या जाळीचे हॅन्डड्रॉप कट करुन तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने प्लायवूडच्या दरवाजाच्या जाळीचे आतील हँडड्रॉपच्या वरील बाजूला छिद्रं पाडून दरवाजाच्या आतील सरकते हँडड्रॉपची कडी सरकवून दरवाजा उघडला. २६ तोळ्याचे दागिने आणि जक्का यांच्या मुलाच्या पँटच्या खिशातील आणि गणपती वर्गणीची अशी २१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. 
जक्का यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक कोल्हाळ करीत आहेत.

Web Title: Piracy in Solapur; 26 Tola gold lumpas