शिक्षक मलाव यांची चित्रे नववीच्या अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST2021-01-04T04:19:59+5:302021-01-04T04:19:59+5:30

कुरुल : मोहोळ तालुक्यात कामती खुर्द लमाणतांडा येथील परमेश्वर आश्रमशाळेतील कलाशिक्षक सुरेश भागवत मलाव यांच्या चित्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य ...

Pictures of teacher Malav in the ninth syllabus | शिक्षक मलाव यांची चित्रे नववीच्या अभ्यासक्रमात

शिक्षक मलाव यांची चित्रे नववीच्या अभ्यासक्रमात

कुरुल : मोहोळ तालुक्यात कामती खुर्द लमाणतांडा येथील परमेश्वर आश्रमशाळेतील कलाशिक्षक सुरेश भागवत मलाव यांच्या चित्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नववीच्या चित्रकला व रंगकाम या कार्यपुस्तिकेत सन २०२०- २१ या शैक्षणिक वर्षांपासून केला आहे.

विद्यार्थ्यांना सहजरित्या समजतील अशी सहज, आकर्षकरित्या चित्रे काढून दिल्याने कलाशिक्षक मलाव यांच्या चित्रांची निवड झाली. मलाव हे दरवर्षी शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवितात. यापूर्वी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

यापूर्वी त्यांनी बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर कला विषयाच्या हस्तपुस्तिकेसाठी समीक्षक म्हणून काम केले आहे .

मलाव यांच्या चित्रांचा पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे, आश्रमशाळेचे अध्यक्ष चंद्रकांत देशमुख, मुख्याध्यापक जब्बार शेख, संचालक रामभाऊ दुधाळ, बाळासाहेब डुबे-पाटील, प्रशांत पाटील, तायाप्पा पुजारी, ताजोद्दीन शेख यांनी कौतुक केले आहे.

----

फोटो : ०३ मलाव, ०३ कुरुल

Web Title: Pictures of teacher Malav in the ninth syllabus