अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: June 1, 2023 13:19 IST2023-06-01T13:19:09+5:302023-06-01T13:19:16+5:30

अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून तिच्या सोबत काढलेले फोटो साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Photos with minor girl viral on social media, crime against youth | अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा

अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा

सोलापूर : अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून तिच्या सोबत काढलेले फोटो साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी कृष्णा ज्ञानदेव चंदनशिवे ( वय २४, रा. शेळगी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पीडित तरुणी ही १७ वर्षाची असून आरोपी कृष्णा हा तिचा पाठलाग करत होता. याबाबत पीडितेने आईवडिलांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आई वडिलांनी आरोपीच्या नातेवाईकांना सांगितले होते. त्यानंतरही आरोपीच्या वागणुकीत बदल झाला नाही. शिवाय त्याने पीडितेशी गोड बोलत तिचा पाठलाग सुरू केला.

शिवाय तिच्या सोबत काढलेले फोटो साेशल मीडियावर व्हायरल केले. अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Photos with minor girl viral on social media, crime against youth