शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

पुण्यातील 'त्या' ‘कोरोना’ग्रस्ताचा फोटो व्हायरल, फेसबुक युजरविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 11:59 IST

आपत्तीविरोधात यंत्रणा सज्ज : डॉक्टरांच्या पूर्वतयारीसाठी बैठका; मास्क, सॅनिटायझर मूळ किमतीत विकण्याचे आवाहन

सोलापूर : पुण्यातील ‘कोरोनाग्रस्त’टॅक्सीचालक मूळचा सोलापूर जिल्ह्यातील गुरसाळेचा असून, गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या नातेवाईकांना वेगळ्याच त्रासाला तोंड द्यावे लागत असल्याचे उघडकीस आले आहे. एका अतिउत्साही कार्यकर्त्याने या रुग्णाच्या फोटो-नावासहित माहिती फेसबुकवर व्हायरल केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही विनाकारण घबराट निर्माण झाली.  दरम्यान, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

दुबईहून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्याला टॅक्सीतून घेऊन गेल्यानंतर संबंधित टॅक्सीचालकालाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, या सर्वांवर व्यवस्थित उपचार सुरू असतानाच मांजरी येथील एका अतिउत्साही कार्यकर्त्याने फेसबुकवर या टॅक्सीचालकाचा फोटो टाकून त्या खाली कोरोनाग्रस्त रुग्ण म्हणून माहितीही अपलोड केली. पाहता पाहता ही पोस्ट व्हायरल होताच संबंधित रुग्णाच्या घराभोवती गर्दी होऊ लागली. या रुग्णाच्या नातेवाईकांनी घराबाहेर पडू नये, अशीही विनंती नागरिक करू लागले. सातत्याने लोकांचे फोन नातेवाईकांना येऊ लागले. शेवटी याला कंटाळून संबंधित रुग्णाच्या भावाने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या वादग्रस्त पोस्टबाबत तक्रार केली. संबंधित पोस्ट काढून टाकण्यात येण्याची मागणीही केली.कोरोनासारख्या संवेदनशील आजाराच्या बाबतीत रुग्णाची माहिती फोटोसह जगासमोर आणणे, अत्यंत चुकीचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली आहेच; कृपया लोकांनी संयम बाळगून आम्हाला सहकार्य करावे. टॅक्सी चालकाचा भाऊ, पुणे

मास्कच्या उपलब्धतेचा रोज आढावानागरिकांच्या मागणीमुळे शहरामध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मास्क व सॅनिटायझरचा रोज आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी दिली. असोसिएशनतर्फे बुधवारी रात्री पुरवठादारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस ३५ पुरवठादारांची उपस्थिती होती. या बैठकीत पुरवठादार व विक्रेत्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. विके्र त्यांनी चढ्या भावाने मास्क व सॅनिटायझरची विक्री न करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. ग्राहकांना मास्क विकताना एमआरपीपेक्षा जास्त किमतीने विकू  नका, असे सांगण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांच्या आरोग्य सेवेत कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाSolapurसोलापूरPuneपुणेTaxiटॅक्सीDubaiदुबई