माहेरातील जमिनीचा हिस्सा विकून पैसे आणावेत म्हणून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST2021-09-03T04:23:30+5:302021-09-03T04:23:30+5:30

अक्कलकोट : माहेरी हिश्श्याला येणारी जमीन विकून पैसे घेऊन यावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सासरच्या ...

Persecution for selling land in Mahera to bring money | माहेरातील जमिनीचा हिस्सा विकून पैसे आणावेत म्हणून छळ

माहेरातील जमिनीचा हिस्सा विकून पैसे आणावेत म्हणून छळ

अक्कलकोट : माहेरी हिश्श्याला येणारी जमीन विकून पैसे घेऊन यावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रूपा नागराज अलकुंटे (वय ३४, रा. आनंद हॉस्पिटल, इंडी रोड, विजयपूर) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी पती नागराज बाबू अलकुंटे, शांताबाई बाबा अलकुंटे, बाबू रामचंद्र अलकुंटे, प्रशांत बाबू अलकुंटे (सर्व रा. इंडी रोड, विजयपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ८ मे २०२० ते ८ मे २०२१ या वर्षभरात जाचहाट केला. ८ मे २०२१ रोजी तीन मुलांसह तिला हाकलून दिले. तसेच तिला वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस नाईक आसिफ शेख करीत आहेत.

Web Title: Persecution for selling land in Mahera to bring money