सोलापूरात ७ लाखांचे दारूमिश्रित रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 13:05 IST2017-08-26T13:05:48+5:302017-08-26T13:05:56+5:30

सोलापूर दि २६ :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ हजार रूपये किंमतीचे ३६ हजार लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले.

The performance of Solapur taluka police in Solapur is destroyed by the loss of Rs. 7 lakhs | सोलापूरात ७ लाखांचे दारूमिश्रित रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी

सोलापूरात ७ लाखांचे दारूमिश्रित रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २६ :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ हजार रूपये किंमतीचे ३६ हजार लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले. ही कारवाई शनिवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर तालुका पोलीसांनी केली़ 
या प्रकरणी हातभट्टी चालक राजू लिंबाजी पवार (रा.मुळेगाव) याच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर तालुका पोलिस ठाण्यांने मुळेगाव येथे छापा टाकून १८२ प्लॉस्टीक बॅरेल मधील ३६ हजार ४०० गुळमिश्रीत रसायन नष्ट केले. पोलीस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोहेकॉ. गायकवाड, नरोटे, पोलीस नाईक नरोटे, करे, माळी आदींनी ही कामगिरी केली. मागील काही दिवसांपासून सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसायांवर मोठया प्रमाणात धाड टाकून कारवाई करण्यात येत आहे़ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीसांची टिम कार्यरत आहे़ 

Web Title: The performance of Solapur taluka police in Solapur is destroyed by the loss of Rs. 7 lakhs