रस्ता ओलांडणारा पादचारी दुचाकीच्या धडकेत ठार
By दिपक दुपारगुडे | Updated: May 13, 2023 19:47 IST2023-05-13T19:47:13+5:302023-05-13T19:47:22+5:30
चालकावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रस्ता ओलांडणारा पादचारी दुचाकीच्या धडकेत ठार
सोलापूर : गुरूनानक चौकाकडून घरी जात असताना दोन नंबर एसटी स्टॅण्ड येथे रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसल्याने संजय कलादगी (वय ४२, रा. शास्त्रीनगर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संगीता संजय कलादगी (वय ३५, रा. शास्त्रीनगर) यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालकावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संजय हे ९ मे रोजी रात्री दोन नंबर एसटी स्थानक परिसरात रस्ता ओलांडताना एका दुचाकी स्वाराने हायगयीने दुचाकी चालवत त्यांना जोरात ठोकरले. यात मार लागून संजय गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास वाघमोडे करत आहेत.