करमाळा तालुक्यातही आढळला रुग्ण; झरे येथील एकाला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:52 IST2020-06-22T16:20:28+5:302020-06-22T16:52:32+5:30
सोलापूर जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठजण पॉझिटिव्ह

करमाळा तालुक्यातही आढळला रुग्ण; झरे येथील एकाला कोरोनाची लागण
सोलापूर : आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या करमाळा तालुक्यानेही सोमवारी खाते उघडले आहे. तालुक्यातील झरे येथे एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठ रुग्ण दिसून आल्याने रुग्णसंख्या २0४ इतकी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बोरगाव, सलगर, मैंदर्गी, करजगीचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यात आता कोरोना वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत मंगळवेढा व करमाळा तालुका कोरोना मुक्त होते. पण सोमवारी करमाळा तालुक्यातील झरे येथे एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले असून, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी तालुक्यातील संर्सग रोखण्यात आरोग्य यंत्रणेची उपाययोजना असफल ठरत चालली आहे.
जिल्ह्यात सोमवारी १0७ अहवालाचा रिर्पोट आला त्यात ८८ निगेटीव्ह तर आठ पुरूष रुग्ण पॉझीटीव्ह आहेत. अशाप्रकारे १९६ रुग्णांची नोंद झाली होती, त्यात सोमवारी ८ रुग्णांची भर पडली आहे. अशाप्रकारे २0४ रुग्णसंख्या झाली असून, त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. अक्कलकोट, बुधवारपेठ:१. उल्हासनगर:२, बोरगाव:१, सलगर:१, करजगी:१, मैंदर्गी:१, करामाळा, झरे:१.