शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील शोरुम्समध्ये पानिपतच्या ‘सोलापुरी चादरी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 13:04 IST

बनावट चादरींनाही मागणी : सोलापुरी ब्रँडवर खप; उद्योजकांची संख्या दोनशेवरून केवळ चाळीसवर

सोलापूर : सोलापुरातील उरल्यासुरल्या चादर शोरुम्समध्ये पानिपतच्या चादरींनी कब्जा केला आहे़ सोलापुरी चादरींचे उत्पादन घटल्याने येथील शोरुम्सदेखील घटले़ येथील शोरुम्समध्ये सत्तर टक्के चादरी या पानिपत आणि इरोड येथील आहेत़ पानिपतचे उद्योजक सोलापूर ब्रँडने चादरी तयार करतात आणि या चादरी आता येथील शोरुम्समध्ये सहज उपलब्ध होत आहेत़ परप्रांतातून आलेले नागरिक या चादरी सोलापुरी चादरी म्हणून खरेदी करताहेत़ यामुळे सोलापुरी चादरीचे वैभव संपुष्टात येईल, अशी भीती येथील उद्योजकांना आहे़ पानिपतच्या चादरी सोलापुरात विकणे ही बाब अत्यंत चिंताजनक असून यावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाने केली आहे.

दहा वर्षांपूर्वी सोलापुरातील दोनशेपेक्षा अधिक उद्योजकांकडे चादरीचे उत्पादन घेतले जात होते़ आता ती संख्या चाळिशीवर आली आहे़ त्यामुळे शोरुम्सची संख्या देखील आपोआप घटली़ पूर्वी सोलापुरात जवळपास पन्नास ते साठ चादर शोरुम्समध्ये सोलापुरी चादरींची विक्री होत असे़ आता केवळ दहा ते बारा शोरुम्स आहेत आणि या शोरुम्समध्ये सोलापुरी चादरींची संख्या केवळ पंचवीस टक्केच आहे़ उर्वरित पंचाहत्तर टक्के चादरी या सोलापुरी बनावटीच्या आहेत आणि या बनावट चादरींचे उत्पादन पानिपत येथे होते, ही धोकादायक बाब आहे़ वेळीच यावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी केली आहे़ ते म्हणाले, सोलापुरी चादरीला जिओग्राफिकल इंडिकेट अर्थात जीआय प्राप्त आहे़ याच्या बनावट उत्पादनावर कायद्याने बंदी आहे़ यावर प्रबोधन करणे गरजेचे आहे़ व्यापाºयांनी दक्ष राहण्याची गरज आहे, अन्यथा सोलापुरी चादरींचा उद्योग संपुष्टात येईल़

वर्षभराचे आयुष्य !- पानिपतच्या चादरी या सोलापुरी चादरींप्रमाणे सेम टू सेम असतात़ चादरीच्या किनारपट्टीवर सोलापूर चादर असे लिहिलेले असते़ रंगाने फिक्कट, पातळ आणि वजनाने हलके तसेच सोलापूरसारखे आकर्षक डिझाईन असे पानिपतच्या चादरींचे वैशिष्ट्य आहे़ या चादरींचे आयुष्य केवळ बारा महिन्यांचे असते़ त्या लवकर खराब होतात़ इरोडच्या चादरी देखील अशाच असतात़ पानिपतच्या चादरी या सोलापूर चादरींपेक्षा स्वस्त असतात आणि यात व्यापाºयांना अधिक मार्जिन मिळतो. त्यामुळे व्यापारी सोलापुरी चादरींपेक्षा पानिपतच्या चादरी विक्रीला प्राधान्य देतात.

सोलापूरच्या शोरुम्समध्ये पानिपत आणि इरोड येथील बनावटी चादरी मोठ्या प्रमाणात विकताहेत. ही चुकीची बाब आहे़ सोलापुरी चादर ही सोलापूरचे भूषण आहे़ . येथील वैभव आहे़ या वैभवाला मूठमाती देऊ नका. पानिपतच्या बनावटी चादरींना सोलापुरातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे़ येथील व्यापाºयांनी याकडे दुर्लक्ष करू नये. हे असेच सुरू राहिल्यास लोक भविष्यात फक्त पानिपत आणि इतर राज्यांतील चादरीच खरेदी करतील़ सोलापुरी उद्योग मागे पडेल़ संपुष्टात येईल. व्यापाºयांनी याचा जरुर विचार करावा.- अविनाश कोंडाचादरीचे जुने व्यापारी

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगPanipat Movieपानिपत