पोलिस असल्याची बतावणी करून पंढरपुरात महिलेला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:41 IST2020-01-22T13:38:10+5:302020-01-22T13:41:33+5:30
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ५० हजाराचा ऐवज लंपास

पोलिस असल्याची बतावणी करून पंढरपुरात महिलेला लुटले
पंढरपूर : पोलिस असल्याची बतावणी करून चोराने महिलेचे सोन्याच्या ऐवजासह ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी सांगोला चौकात घडली आहे.
पंढरपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वजीरा बागवान (रा़ मंगळवेढा) येथून एसटी बसने पंढरपूरकडे येत होत्या. त्या पंढरपूर येथील सांगोला चौक येथे उतरल्या. त्यावेळी तीन इसम त्या ठिकाणी आले. पुढे पोलीस आहेत. तुमचे अंगावरील सर्व सोने काढुन तुमच्या पिशवीत ठेवा, असे विश्वासाने सांगितले. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेऊन वाजिरा बागवान त्यांच्यासोबत आडबाजूला गेल्या. त्यावेळी त्यांनी उजव्या हातातील सोन्याची बांगडी, पाटली हातास तेल लाऊन काढली. त्याठिकाणी लोकांचा ये-जा वाढल्याने बागवान यांची नजर चुकवुन तेथुन सोन्याची बांगडी, पाटली घेऊन चोर पसार झाले. याबाबत वाजीरा भगवान यांचा मुलगा बिलाल गणी बागवान (वय ४४, रा़ बेगमपूर, ता़ मोहोळ जिल्हा, सोलापुर) याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.