पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:36+5:302021-09-02T04:48:36+5:30

कर्तव्य प्रामाणिकपणे बजाविणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात. ...

Pandharpur Municipal Council employees staged a work stoppage agitation | पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन

पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन

कर्तव्य प्रामाणिकपणे बजाविणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात. प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्याचा संघटित निषेध नोंदविण्यासाठी व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी या घटनेचा निषेध म्हणून पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.

राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर, पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नाना वाघमारे, कार्याध्यक्ष शरद वाघमारे, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष किशोर खिलारे, जयंत पवार, अनिल गोयल, नागनाथ तोडकर, गुरू दोडिया, महावीर कांबळे, दशरथ यादव, विठ्ठल वाघमारे, दत्तात्रेय चंदनशिवे, संजय माने, संभाजी देवकर, चिदानंद सर्वगोड, नेताजी पवार, सुवर्णा डमरे, प्रज्ञा देशमुख, अस्मिता निकम, राणी गायकवाड व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

-----

फोटो : ३१ पंढरपूर

पंढरपूर नगर परिषदेत आंदोलन करताना अधिकारी व कर्मचारी.

Web Title: Pandharpur Municipal Council employees staged a work stoppage agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.