विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूर-घुमान सायकल यात्रेस प्रारंभ!
By काशिनाथ वाघमारे | Updated: November 23, 2023 18:01 IST2023-11-23T18:01:27+5:302023-11-23T18:01:45+5:30
प्रस्थान पूजा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर व त्यांच्या पत्नी सीमाताई नेवासकर यांच्या हस्ते करण्यात झाली.

विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूर-घुमान सायकल यात्रेस प्रारंभ!
सोलापूर : भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान (पंजाब) अशा सुमारे २,१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेस गुरुवारी विठ्ठल नामाच्या जयघोषात प्रारंभ झाला.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव दरबार कमिटी घुमान (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराज यांची पंढरपूर ते घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली आहे. सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत. या यात्रेने २३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून प्रस्थान केले. प्रस्थान पूजा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर व त्यांच्या पत्नी सीमाताई नेवासकर यांच्या हस्ते करण्यात झाली.
याप्रसंगी सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे, विभागीय उपाध्यक्ष रवीअण्णा राहणे, अजिंक्य शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष अतुल मानकर, पंकज सुत्रावे, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे यांच्यासह सायकल यात्री उपस्थित होते.
दरम्यान, आज हा सोहळा अरण, कुर्डुवाडी, म्हैसगाव मार्गे बार्शी मुक्कामी पोहोचला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे पोचणार आहे.