तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे. ...
मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दुचाकीला मागुन धडक देऊन अंगावरुन ट्रक नेल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना ११ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवरील कुर्डू हद्दीतील दत्त मंदीराजवळ घडली. ...
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील वाकीशिवणे येथील ओढयाच्या पाण्यात पाच जण बुडाल्याची घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़ मात्र यातील दोघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले ...
महावितरणच्या बारामती परिमंडलातील पावणेदोन लाखांहून अधिक ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाईन भरणा केला आहे. ...
कर्जमाफीसाठी शेतक-यांची नावे सरकारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यात अवघे ११ टक्केच झाले आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल ...
भाजप सरकारची पोलखोल करणारी फलकबाजी व निषेध करत तसेच भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार मोर्चा काढून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील कासेगाव व तळेहिप्परगा येथील अवैध दारू आड्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमने छापा मारल़ या कारवाईत पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन ६८ हजार ७८० रूपयांचा माल हस्तगत केला़ ...
ना ओळख ना पाळख़, ना नातेगोते, पण एका अवघडलेल्या महिलेची प्रसूती करण्यासाठी इतर महिला धावल्या आणि त्या सुखरूप प्रसूती झाली़ माणुसकीचा हा पाझर सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी पाहायला मिळाला. ...
भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व महाराष्ट्र वन्यजीव विभागाच्या वतीने माळढोक व अन्य पक्ष्यांच्या राज्यभरात केलेल्या सहा दिवसांच्या विशेष सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नाही. ...