वाळू चोरी प्रकरणी पाेलीस पाटलाच्या मुलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST2021-06-11T04:16:05+5:302021-06-11T04:16:05+5:30

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोहोरगाव (ता. पंढरपूर) मध्ये वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सपोनि आदिनाथ खरात, ...

Paelis Patla's son arrested in sand theft case | वाळू चोरी प्रकरणी पाेलीस पाटलाच्या मुलाला अटक

वाळू चोरी प्रकरणी पाेलीस पाटलाच्या मुलाला अटक

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोहोरगाव (ता. पंढरपूर) मध्ये वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सपोनि आदिनाथ खरात, सपोनि शंकर ओलेकर, पोउनि सचिन वसमळे, पोलीस शिपाई देवेंद्र सूर्यवंशी, होमगार्ड सचिन मदने, होमगार्ड सोमनाथ सूळ यांना संबंधित ठिकाणी कारवाईसाठी गेले.

या छाप्यामध्ये ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले. प्रत्येक ट्रॅक्टरला एक डम्पिंग ट्रॉली व त्यात वाळू भरलेली मिळून आली. या कारवाईत वाळू व ३ ट्रॅक्टर असा एकूण १४ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संतोष दादाराव पाटील (२६), नितीन धनाजी गायकवाड (२४), बालाजी शंकर गायकवाड (२६, सर्व रा. पोहोरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. यातील संतोष दादाराव पाटील याचे वडील पोहरगावचे पोलीस पाटील आहेत. तसेच त्याच्यावर वाळू चोरीचे यापूर्वी देखील दोन गुन्हे नोंद आहेत. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक चंदनशिवे हे करत आहेत.

----

Web Title: Paelis Patla's son arrested in sand theft case