शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:48 IST

या प्रकरणातील आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सोलापूर : राजकीय वैमनस्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य आणि आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हंडे यांना घरासमोर मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरारक घटना अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी कर्नाटकातील झळकी येथून आरोपींना पाच तासात पकडले. शुक्रवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी हंडे यांची भेट घेऊन या हल्ल्याचे मास्टरमाइंड आमदार राेहित पवार आहेत, असा आराेप केला.

या प्रकरणातील आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आमदार पडळकर यांच्या शरणू हांडे या कार्यकर्त्याच्या अपहरणाचा कट गुरुवारी रात्री उघडकीस आला. याबाबत आमदार पडळकर म्हणाले, माझ्या गाडीवर २०२१ साली अमित सुरवसे याने माेठा दगड टाकला. शरणू हांडे याला अमानुषपणे मारायचा अमित सुरवसे याचा प्लॅन हाेता.गाडीत असताना अमितने एक व्हिडीओ काॅल केला. या व्हिडीओ काॅलवर त्याला माफी मागायला सांगण्यात आली. पण शरणूने नकार दिला. हा काॅल आमदार राेहित पवार यांना केल्याचे पडळकर म्हणाले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरRohit Pawarरोहित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकर