बारामती, साताऱ्यातून माळशिरसला ऑक्सिजन पुरवठा थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:25+5:302021-04-23T04:24:25+5:30

वाघोली : माळशिरस तालुक्याला दररोज २५० सिलिंडर व ४८० रेमडेसिविरची गरज आहे. बारामती व सातारा येथून होणारा ऑक्सिजन पुरवठाही ...

Oxygen supply to Malshiras from Baramati, Satara stopped | बारामती, साताऱ्यातून माळशिरसला ऑक्सिजन पुरवठा थांबला

बारामती, साताऱ्यातून माळशिरसला ऑक्सिजन पुरवठा थांबला

Next

वाघोली : माळशिरस तालुक्याला दररोज २५० सिलिंडर व ४८० रेमडेसिविरची गरज आहे. बारामती व सातारा येथून होणारा ऑक्सिजन पुरवठाही बंद आहे. टेंभुर्णी व सोलापूर येथून केवळ १०० ते १२५ सिलिंडरचा पुरवठा होतो. केवळ ४५ ते ५० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होतात. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार करणे डॉक्टरांना कठीण होत असल्याची खंत प्रांताधिकारी शमा पवार यांनी व्यक्त केली.

आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी १४ दिवस गृह अलगीकरणाचा कालावधी संपताच त्यांनी तालुक्यातील अधिकारी, डॉक्टरांची बैठक घेऊन कोरोनाचा आढावा घेतला.

या बैठकीला तहसीलदार जगदीश निंबाळकर, पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरू, शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्रेणीक शहा, माळशिरसचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, सचिव डॉ. नितीन राणे, डॉ. नितीन एकतपुरे, डॉ. धनेश गांधी, डॉ. तानाजी कदम, डॉ. निनाद फडे, डॉ. सुनील नरुटे, डॉ. माधव लवटे, डॉ. सुधीर पोपळे, डॉ. हरिश्चंद्र सावंत - पाटील, डॉ. स्मिता शिंदे, गॅस पुरवठाधारक दुष्यंत ताम्हाणे उपस्थित होते.

कोरोनाच्या आढाव्यानंतर आमदार मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व विभागीय आयुक्त सौरभ राव यांना फोन करुन तालुक्याचा आढावा मांडला. अकलूज हे मेडिकल हब असल्याने माळशिरस तालुक्यासह इंदापूर, बारामती, फलटण, माण, आटपाडी, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माढा, करमाळा आदी तालुक्यांतील कोरोना रुग्ण अकलूजला खासगी रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे माळशिरस तालुक्यासाठी तातडीने ऑक्सिजन व रेमडेसिविरचा पुरवठा करावा, अशी मागणी केली.

तालुक्यात १६८० रुग्ण

माळशिरस तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,६८० आहे. त्यापैकी ऑक्सिजन बेडवर ४२२ रुग्ण आहेत. तालुक्यातील २५२ तर तालुक्याबाहेरील १७० रुग्ण उपचार घेत आहेत.

---

ऑक्सिजन टँकर घेण्यासाठी तहसीलदार पुण्याला

आमदार मोहिते-पाटील यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा करण्याचे तर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ऑक्सिजनचा टॅंकर तातडीने सोलापूरकडे रवाना करण्याच्या सूचना दिल्या. हा टॅंकर ताब्यात घेण्यासाठी तहसीलदार जगदीश निंबाळकर हे तातडीने पुण्याकडे रवाना झाले.

Web Title: Oxygen supply to Malshiras from Baramati, Satara stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.