शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मालक राष्ट्रवादीत जातोय ! संजयमामांचा पालकमंत्र्यांना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:19 IST

महाआघाडीमध्ये पडसाद : संजय शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला; भाजपची तिखट प्रतिक्रिया

ठळक मुद्देभाजपामुळेच संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. आता राष्ट्रवादीत जातानाही त्यांना भाजपचा उपयोग झाला - शहाजी पवारसंजय शिंदे यांना भाजपाने उमेदवारी देण्याची तयारी दाखविली होती. पण त्यांनी नकार दिला - विजयकुमार देशमुख

सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या राष्टÑवादी प्रवेशानंतर भाजपा पुरस्कृत महाआघाडीतून तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत. संजय शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा शब्द देउन आले होते. परंतु, त्यांनी तो शब्द फिरविला. संजयमामा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना फोन करुन राष्ट्रवादीत जात असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मात्र शिंदे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला.

सोलापूर विधान परिषदेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रशांत परिचारक, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राउत, उत्तम जानकर, शहाजीबापू पाटील आदींची मोट बांधली होती. या नेत्यांच्या माध्यमातूनच भाजपाने माढा लोकसभेची तयारी केली होती.

माढ्यातील उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना दोनवेळा वर्षा बंगल्यावर बोलाविले होते. पण या बैठकीत शिंदे यांनी करमाळा विधानसभेच्या निवडणुकीत रस असल्याचे सांगितले. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना विचारणा केली होती. आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राउत यांना बोलावून घेतले होते. पण आता शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या निर्णयानंतर परिचारक आणि राउत यांची कोंडी झाली आहे. परिचारक आता कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.

सहकारमंत्री गटाला म्हणे साशंकता होतीच !- महाआघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना आपला नेता मानले आहे. पण सहकारमंत्री सुभाष देशमुख गटातील नेत्यांनी महाआघाडीतील नेत्यांवर वारंवार संशय व्यक्त केला होता. ही मंडळी सत्तेचा फायदा घेतील. ऐनवेळी राष्ट्रवादीत जातील, असे सहकारमंत्री गट वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगत होता. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी संजय शिंदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना फोन करुन राष्ट्रवादीत जाण्याबाबत कल्पना दिली. 

संजय शिंदे यांना भाजपाने उमेदवारी देण्याची तयारी दाखविली होती. पण त्यांनी नकार दिला. आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत. ते आमचे चांगले मित्र होते. आता तो त्यांचा निर्णय आहे. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री. 

या असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा : पवार- भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, भाजपामुळेच संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. आता राष्ट्रवादीत जातानाही त्यांना भाजपचा उपयोग झाला. अध्यक्ष होताना त्यांनी भाजपाकडे सहकार्य मागितले. भाजपाने त्यांना विनाअट सहकार्य केले. परंतु, त्यांनी मैत्री निभावलेली नाही. साडेचार वर्षात  सत्तेचा फायदा घेतला. मैत्रीची जबाबदारी निभावण्याची वेळ आल्यावर पाठीत खंजीर खुपसला. या अशा मित्रपेक्षापेक्षा आम्हाला उघडचा शत्रू चांगला वाटतो. आता राजकारणात हे नवीन नाही. या अशा गुणांमुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जनतेने नाकारले आहे. अशा स्वभावाच्या माणसांनी सर्वांना फसविलेले आहे. मुळातच शरद पवार यांनी फसवा फसवीचे राजकारण केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार