शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सोलापूर विद्यापीठात २९ शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:38 AM

सोलापूर विद्यापीठ : विद्यापीठ निधीवर दोन कोटींचा बोजा

ठळक मुद्देकाळ्याचे पांढरे करण्यासाठी मानसेवी अधिकारी महालेखापाल यांना मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित

संताजी शिंदेसोलापूर : महाराष्ट्र शासनाची नोकर भरतीवर बंदी असताना २०१६-१७ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.एन.मालदार यांनी २९ शिक्षकेतर कर्मचाºयांची नियमबाह्य भरती केली. या भरतीला आजतागायत मान्यता मिळाली नसून वेतनापोटी व इतर खर्च मिळून २ कोटी रूपयांचा बोजा विद्यापीठ निधीवर पडला आहे. वेतनापोटी दरमहा ६ लाख रूपये बोजा वाढत आहे. 

महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवर बंदीचा आदेश घातला होता. असे असताना तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी २0१६-१७ या कालावधीत २९ कर्मचाºयांची बेकायदेशीर भरती केली. निर्बंध असताना भरती केल्यामुळे शिक्षण संचालनालय (उ.शि.) पुणे व संचालक, उच्च शिक्षण विभाग, सोलापूर यांनी दिनांक २७ एप्रिल २0१७ रोजी पत्रान्वये (क्र. विससं/उशि/सोविसो/२0१७/८५७५८ प्रमाणे) मान्यतेचा प्रस्ताव विद्यापीठास परत केला आहे. त्यामुळे कोणत्याही उच्च शिक्षण विभाग, मुंबई अथवा पुणे येथे या मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित नाही. 

महालेखापाल यांना मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, अशी खोटी माहिती दिली आहे. या भरतीवर आजतागायत वेतनापोटी व इतर खर्च मिळून २ कोटी रूपये इतक्या रकमेचा बोजा विद्यापीठ निधीवर झालेला आहे. वेतनापोटी दरमहा ६ लाख रूपयांनी हा बोजा वाढत आहे. डॉ.एन.एन.मालदार यांची भीती व मर्जी सांभाळण्यासाठी आजपर्यंत २९ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात आलेले नाही. डॉ. एन.एन. मालदार यांनी २९ कर्मचाºयांची, महाराष्ट्र शासनाची व विद्यापीठाची फसवणूक केली आहे. 

माजी बी.सी.यु.डी. डायरेक्टर आर.वाय. पाटील यांची सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, सोलापूर यांनी वेतन निश्चिती केली होती. वेतन निश्चिती डावलून शासन अनुदानातून डॉ. एन.एन.मालदार यांनी आपल्या अधिकारामध्ये माजी बी.सी.यु.डी. डायरेक्टर आर.वाय.पाटील यांना जादा वेतन दिले. ही रक्कम २ लाख ६५ हजार इतकी होते. ही जाणीवपूर्वक शासन अनुदानाची फसवणूक करण्यात आली आहे, अशी  तक्रार प्रभाकर कुलकर्णी यांनी राज्यपाल विद्यासागर राव व सध्याच्या नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

काळ्याचे पांढरे करण्यासाठी मानसेवी अधिकारी च्विद्यापीठात मानसेवी अधिकारी म्हणून सतीश नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन निर्णयाच्या आदेशाचे व विद्यापीठ कायदा २0१६ चे उल्लंघन करून जी कामे केली आहेत ती अमान्य न होता मान्य करून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजे काळ्याचे पांढरे करणे हे त्यांचे काम आहे. दिनांक ८ जानेवारी २0१६ चा शासन निर्णय डावलून त्यांना जादा वेतन त्यांच्या नेमणुकीपासून देण्यात आले आहे. हा खर्चदेखील विद्यापीठ निधीतून केला जात असल्याचा आरोप प्रभाकर कुलकर्णी यांनी केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर