शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्यातील १७ साखर कारखान्यांकडे एफआरपीचे १३३ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 15:29 IST

सोलापुर जिल्ह्यातील ४ कारखान्यांचा समावेश : उच्च न्यायालयात साखर आयुक्तालयाचे स्पष्टीकरण

ठळक मुद्देकायद्यानुसार ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसात कारखान्याने एफआरपीचे देणे देणे बंधनकारकएफआरपी न देणाºया कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचा आदेश १७ साखर कारखाने एफआरपीनुसार १३२ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये शेतकºयांचे देणे

सोलापूर: राज्यातील १७ साखर कारखान्यांनी एफआरपीचे अद्यापही १३२ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये दिले नसल्याचे साखर आयुक्तालयाच्या वतीने सांगितले. मात्र याला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पुढील सुनावणी (३ नोव्हेंबर)पर्यंत गाळप परवान्याबाबत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले.

एफआरपी थकविणाºया कारखान्याबाबत गोरख घाडगे व सुनील बिराजदार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे व भारती डोंगरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मूळ याचिकेत मागील वर्षीच्या गाळपासाठी आणलेल्या उसाचे एप्रिलमध्ये २१५० कोटी रुपये कारखानदारांनी दिले नसल्याचा उल्लेख आहे. यावर न्यायालयात मागील सुनावणीवेळी २६ साखर कारखान्यांकडे १७६ कोटी ४१ लाख रुपये एफआरपीपोटी देय असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगितले होते. बुधवारी उच्नन्यायालयातीलसुनावणीवेळी १७ साखर कारखाने एफआरपीनुसार १३२ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये शेतकºयांचे देणे असल्याचे सांगण्यात आले. यावरयाचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. आशिष गायकवाड यांनी हरकत घेतली. 

कायद्यानुसार ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसात कारखान्याने एफआरपीचे देणे देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित केला. नियमानुसार उशिरा पैसे देणाºया कारखान्यांनी व्याजाचीही रक्कम दिली पाहिजे, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितले. यावर न्यायालयाने मार्ग काढा, परंतु पुढील सुनावणीपर्यंत एफआरपी न देणाºया कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचा आदेश कायम असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिकाºयांना सांगितले. पुढील सुनावणी ३ नोव्हेंबरला होणार आहे. 

सोलापूरचे चार कारखानेसिद्धेश्वर सोलापूर (३ कोटी १७ लाख), मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट (९ कोटी ४२ लाख), विठ्ठल रिफाईन करमाळा (६ कोटी एक लाख), श्री मकाई करमाळा (एक कोटी ५७ लाख) या कारखान्यांकडे एफआरपी देय आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरीagricultureशेती