शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

औज बंधारा भरला फुकटात, सोलापूर महापालिकेचे पाण्याचे ७ कोटी वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 13:27 IST

सोलापूर : वीर धरणातून भीमेत आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे औज व चिंचपूर बंधारे भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर महापालिकेची साडेसात कोटी रुपये पाणीपट्टी वाचली आहे. सातारा जिल्ह्यातील भाटघर, देवधर, वीर धरणे शंभर टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.  १५ आॅगस्ट रोजी वीर धरणातून नीरेत सोडलेले पाणी १९ आॅगस्ट रोजी सकाळी ...

ठळक मुद्देउजनी धरण भरण्याकडे वाटचाल सुरूऔज व चिंचपूर बंधारे भरले हिप्परगा तलाव मायनसमध्ये आहे

सोलापूर : वीर धरणातून भीमेत आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे औज व चिंचपूर बंधारे भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर महापालिकेची साडेसात कोटी रुपये पाणीपट्टी वाचली आहे. सातारा जिल्ह्यातील भाटघर, देवधर, वीर धरणे शंभर टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.  १५ आॅगस्ट रोजी वीर धरणातून नीरेत सोडलेले पाणी १९ आॅगस्ट रोजी सकाळी औज बंधाºयात पोहोचले. त्यानंतर २0 आॅगस्ट रोजी सकाळी औज बंधारा सव्वाचार मीटरने भरून चिंचपूर बंधाºयाकडे पाणी वाहू लागले. २१ आॅगस्ट चिंचपूर बंधारा भरून पाणी कोर्सेगावकडे वाहू लागले. 

औज व चिंचपूर बंधारे क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत आहेत. अद्याप भीमेतून प्रवाह सुरूच आहे. वीर धरणातून पाणी येण्याअगोदर औज बंधारा कोरडा झाला होता. चिंचपूर बंधाºयात अवघ्या २0 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतून पाणी सोडावे लागणार होते.

उजनीतून पाणी सोडले असते तर महापालिकेला पाटबंधारे विभागाची साडेसात कोटी पाणीपट्टी लागू झाली असती. पण निसर्गाने तारल्यामुळे महापालिकेचा फायदा झाला आहे. आता नोव्हेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. या दरम्यान आणखी पाऊस झाला तर चालूवर्षी केवळ तीन पाळ्यातून उजनीतून पाणी घ्यावे लागेल. यामुळे महापालिकेची पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. 

हिप्परगा तलाव मात्र मायनसवर- उजनी धरण भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. औज व चिंचपूर बंधारे भरले आहेत; मात्र हिप्परगा तलाव मायनसमध्ये आहे. या परिसरात पाऊस नसल्यामुळे गेल्या चार महिन्यात पंपिंग करून केवळ पाच एमएलडी पाणी उचलले जात आहे. सद्यस्थितीत उत्तर व तुळजापूर तालुक्यात दमदार पाऊस होऊन हिप्परगा तलाव प्लसमध्ये आल्यास सोलापूरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीSatara areaसातारा परिसर