शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र; गरिबीमुळे कामाला गेलेल्या ३५५ बालकांची झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:29 AM

सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेली आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहिमेंतर्गत ३५५ बालकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित पालकांच्या ताब्यात ...

ठळक मुद्देदोन पीडित, तीन हरवलेल्या बालकांचा समावेशसोलापुरात हॉटेल, कापडाची दुकाने, लॉज आदी ठिकाणी बालकामगार मोठ्या प्रमाणात गेल्यावर्षी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत १६८ मुलांची सुटका करण्यात आली

सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेली आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहिमेंतर्गत ३५५ बालकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामध्ये दोन अपहरण करण्यात आलेली पीडित मुले व तीन हरवलेल्या बालकांचा समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली. 

मोहिमेंतर्गत शहरातील हरवलेली, बेवारस, बालमजूर, कचरा गोळा करणारे, भिक्षा मागणारे तसेच रेकॉर्डवरील बालकांचा शोध घेण्यात आला. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २0१८ दरम्यान ही मोहीम घेण्यात आली. शहरातील सात पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी १ महिला अधिकारी व ३ महिला कर्मचारी, महिला कक्षाकडील ७ महिला कर्मचारी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील २ महिला कर्मचारी असे सर्व मिळून ७ महिला पोलीस अधिकारी व २९ महिला पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बालकल्याण मंडळ, चाईल्ड लाईन, रेल्वे चाईल्ड लाईन व विधायक भारती संस्था, मुंबई आणि बालकामगार अधिकारी सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. 

१८ वर्षांखालील मुलांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा महिला व बालविकास विभागासमोर उभे केले जात होते. बालकांच्या पालकांची खातरजमा करून त्यांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यात आले. मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून प्रोत्साहन देण्यात आले. पिटा अ‍ॅक्ट अंतर्गत एक कारवाई करण्यात आली असून त्यात पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. गेल्यावर्षी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत १६८ मुलांची सुटका करण्यात आली होती. यंदा ३५५ मुलांना स्वगृही पाठवण्यात आले आहे. ही मोहीम पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक दुपारगुडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षा कांबळे यांनी पार पाडली.

काम करणे ही बालकांची मजबुरी- सोलापुरात हॉटेल, कापडाची दुकाने, लॉज आदी ठिकाणी बालकामगार मोठ्या प्रमाणात दिसून येत होते.  जे वय हसण्या-बागडण्याचे, शिक्षण घेण्याचे आहे; त्या वयात मुले कामाला जाऊन घरप्रपंचाला हातभार लावतात.   मात्र कायद्याने हा गुन्हा आहे.  मुलांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात आली.  यामध्ये सर्रास गरीब घरातील मुले आढळून आली.  त्यामुळे काम करणे ही त्यांची मजबुरी होती.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा