शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

फक्त चेहरा अन् हात उरला; माढ्यात बेकरी चालकाची हत्या करून टेम्पो पेटवला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 13:00 IST

शिराळ गावातील घटना; पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

ठळक मुद्देमृत संजय हे बेकरीचा पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते शनिवारी सायंकाळी जेवण आटोपून घराबाहेर अंगणात झोपी गेलेशनिवार सकाळी ते पत्नीला निदर्शनास आले नाहीत, त्यांचा छोटा हत्ती टेम्पो आणि मोबाईल जागेवर नव्हता कॉल केला असता मोबाईलही बंद लागला, पत्नीने सर्वत्र शोध घेतला

टेंभुर्णी / भीमानगर : माढा तालुक्यातील शिराळ येथील एका बेकरी व्यावसायिकाचा अत्यंत क्रूरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या खून प्रकरणाने माढ्यात खळबळ उडाली असून मारेकºयांना शोधणे हे पोलिसांपुढे आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे.

संजय मारुती काळे (वय ५४, रा. शिराळ, ता. माढा) असे खून झालेल्या बेकरी व्यावसायिकाचे नाव आहे़ टेंभुर्णी-अकलूज रोडवर शेवरे परिसरात उजनीच्या डाव्या उजवा-कालव्याच्या साईटपट्टीला रविवारी सकाळी हे खून प्रकरण उघडकीस आले. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मृत संजय हे बेकरीचा पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते शनिवारी सायंकाळी जेवण आटोपून घराबाहेर अंगणात झोपी गेले. शनिवार सकाळी ते पत्नीला निदर्शनास आले नाहीत़ त्यांचा छोटा हत्ती टेम्पो आणि मोबाईल जागेवर नव्हता़ कॉल केला असता मोबाईलही बंद लागला़ पत्नीने सर्वत्र शोध घेतला़  मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान स्वत:च्या छोटा हत्ती (एम़ एच़ ४५-६५७७ ) मालवाहतूक वाहन घेऊन घराबाहेर पडले असल्याचा घरच्या लोकांनी अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी सात वाजता शेवरे (ता. माढा) येथे उजनी कालव्याच्या उजव्या बाजूच्या रस्त्यालगत टेंभुर्णी-अकलूज रस्त्यापासून आतमध्ये जवळपास ६०० फूट अंतरावर शेवरे परिसरात काही पादचाºयांना छोटा हत्ती वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. जवळ जाऊन डोकावले असता अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला़ छातीपासून थोडा वरचा भाग, डोके व एक हात शाबूत होता. बाकी शरीर खालून पूर्णत: जळून खाक झाले होते. मारेकºयांनी चेहºयावर धारदार शस्त्राने वार केलेल्या खुणा आढळून आल्या.

या ठिकाणी टेम्पो ही पलटी झालेला होता. दरम्यान, मारेकºयांनी त्यास ठार करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकू न मृतदेह पेटवून दिला़ माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़  मृतदेह ताब्यात घेऊन तो टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल केला. घटनास्थळी शिराळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीmadha-acमाढाMurderखून