शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सोलापुरातील तेलुगू भवनाचे केवळ ‘स्वप्न’च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 20:11 IST

भाषेच्या संवर्धनासाठीही प्रयत्न अपुरे; विद्यापीठात अध्यासन सुरू करण्याची मागणी

ठळक मुद्देसोलापुरात एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश तेलुगू भाषिक आहेतसध्या तेलुगू भाषेत शिक्षण देणाºया बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेततेलुगू भाषेचा गोडवा टिकून राहावा यासाठी सोलापूर विद्यापीठाने अध्यासन सुरू करण्याची मागणी

महेश कुलकर्णी 

सोलापूर : तेलुगू भाषेच्या संवर्धनासाठी सोलापुरात तेलुगू भवन व्हावे, अशी अनेक तेलुगू भाषिकांची अपेक्षा आहे. यासाठी जागा द्यावी म्हणून मनपाकडे अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले, परंतु उदासीन असलेले प्रशासन आणि केवळ ‘मतपेटी’ म्हणून पाहणाºया राजकीय नेत्यांनी याकडे अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ‘तेलगू भवन’चे स्वप्न अपुरेच राहिले आहे.

सोलापुरात एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश तेलुगू भाषिक आहेत. मराठी भाषेची सेवा करताना मातृभाषा तेलुगूही टिकून राहावी, अशी रास्त अपेक्षा तेलुगू भाषिकांची आहे. सध्या तेलुगू भाषेत शिक्षण देणाºया बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेत आणि तेथे शिकणारे विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतके आहेत. अशा परिस्थितीत तेलुगू भाषेचा गोडवा टिकून राहावा यासाठी सोलापूर विद्यापीठाने अध्यासन सुरू करण्याची मागणी तमाम तेलुगू भाषियांच्या वतीने करण्यात येत आहे. 

पोटासाठी आंध्रप्रदेश आणि कर्नाटकच्या सरहद्दीवरून पावणेदोनशे वर्षांपूर्वी सोलापुरात आलेला विणकर समाज हा तेलुगू भाषिक आहे. पद्मशाली समाजासह जवळपास १८ ते २० जातीचे लोक तेलुगू बोलतात. त्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी केवळ तीन-चार शाळा आहेत. येथे दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते.  महाविद्यालयीन शिक्षण शहरातील कुठल्याही महाविद्यालयात उपलब्ध नसल्यामुळे तेलुगू भाषिकांना इच्छा असूनही पुढे शिकता येत नाही. यासाठी सोलापूर विद्यापीठाने तेलुगू भाषेचा अभ्यासक्रम सुरू करावा.

हिंदीखालोखाल देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा तेलुगू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरात तेलुगू भाषक असूनही या भाषेत शिकणाºयांची संख्या मात्र कमी होत चालली आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी १९९२ साली स्व. कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी तेलुगू भाषा अभिवृद्धी संघम्ची स्थापना केली. हे मंडळ अजूनही सुरू आहे.

मोडी लिपीत तेलुगू भाषेची १४ मुळाक्षरे !- मराठी आणि तेलुगू या दोन्ही भाषा सख्ख्या बहिणी आहेत. पूर्वी मराठीजनांकडून वापरली जाणारी मोडी लिपी ही भाषा तेलुगू कवी हेमाद्री यांनी लिहिलेली आहे. मोडी भाषेत प्रत्येक अक्षरात तेलुगूची १४ मुळाक्षरे आहेत. मराठी संतांनीही कानडी आणि तेलुगूमध्ये अनेक अभंग लिहिले आहेत. मातृभाषा तेलुगू असणाºयांची दातृभाषा मराठी आहे. 

बोल्लींचे स्वप्न अपूर्णच !जीवनभर ‘आंतरभारती’चा वसा घेऊन लेखन करणाºया कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी अनुभवाच्या माध्यमातून मराठी आणि तेलुगू साहित्य समृद्ध केलं. अनेक तेलुगू नाटकं त्यांनी स्वत: मराठी रंगभूमीवर सादर केली; तर मराठी संतांचे गुणगान तेलुगूत गायिले. बोल्ली यांनी आपल्या हयातीत सोलापुरात तेलुगू भवन साकारण्याचे स्वप्न पाहिले होते; शिवाय केवळ सोलापूर जिल्ह्यापुरत्या असलेल्या आपल्या विद्यापीठात तेलुगू भाषा अध्यासन सुरू व्हावे, यासाठीही प्रयत्न केले होते. खरं तर त्यांची ही चळवळ होती. मराठी साहित्यातील या महान कविवर्यांच्या मृत्यूनंतरही तेलुगू भवन आणि अध्यासन सुरू होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

तेलुगू भाषा जिवंत राहण्यासाठी तरुण पिढीला ही भाषा लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घ्यावे. ही तेलुगू वाचन चळवळ अशीच वृद्धिंगत व्हावी यासाठी  काही दानशूर व्यक्तींनी आणि राजकीय पुढाºयांनी पुढे आले पाहिजे. तेलुगू भवन आणि विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत.- मल्लिकार्जुन कमटम,अध्यक्ष, तेलुगू भाषा अभिवृद्धी वाचनालय

टॅग्स :SolapurसोलापूरTelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेश