शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?
2
"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"
3
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
4
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
5
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
6
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
7
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
8
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
9
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
10
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
11
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
12
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
13
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
14
NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
15
NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी
16
नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन
17
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली
18
NDAच्या सभेत स्टेजवर मानाचं स्थान मिळालेली 'ती' एकमेव महिला कोण? जाणून घ्या...
19
“NDAचे सरकार पुढील १० वर्षे असणार, काँग्रेस १००चा आकडाही गाठू शकणार नाही”: नरेंद्र मोदी
20
Railway PSU ला Tata Group कडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्स वधारले; १ वर्षात ७०% रिटर्न

शिवसेनेला विश्वासात घेतले तरच भाजपा विजयदिन पाहील; तानाजी सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:41 PM

महायुतीच्या पदाधिकाºयांचा विजयी संकल्प मेळावा

ठळक मुद्देतुम्ही गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला हवे होते - सावंत भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. पण खाली कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे की नाही याबद्दल संभ्रम होता - सावंत

सोलापूर : गेल्या साडेचार वर्षांत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले नाही याची खंत शिवसेना पदाधिकाºयांच्या मनात आहे. या निवडणुकीत त्यांनी विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी दोन देशमुखांच्या उपस्थितीत भाजपला दिला. 

महायुतीच्या पदाधिकाºयांचा विजयी संकल्प मेळावा झाला. तानाजी सावंत म्हणाले, भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. पण खाली कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे की नाही याबद्दल संभ्रम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी संभ्रमात टाकण्याचे काम केले. पण पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मला खेदाने सांगावे लागते की तुम्ही गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला हवे होते.

आपण सर्वजण विस्थापित आहोत. तळागाळातील कार्यकर्ता आपला केंद्रबिंदू मानून काम करायला हवे होते. तुम्ही या निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. कुठे काही अडचण असेल तर सांगा मी ती दूर करतो, असेही सांगायला सावंत विसरले नाहीत. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले,  तानाजी सावंत यांनी खंत व्यक्त केली. पण दोनवेळा स्वत:हून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांच्या घरी गेलो होतो. यापुढेही सहकार्य राहिले. 

महाराज, बापू बोलले... नीलम तार्इंनी सावरले..- दोन देशमुखांच्या वादामुळे शहराचे वाटोळे झाल्याची टीका काँग्रेसवाले करतात. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येतात याबद्दल सहकारमंत्री देशमुख यांनी खंत व्यक्त केली. त्यावर नीलम गोºहे यांनी वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या तरी तुम्ही मनाला लावून घेऊ नका. काम करत राहा. या जिल्ह्यातील पत्रकारांचे सल्ले मी सुद्धा ऐकते, असा सल्ला देशमुखांना दिला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपल्या भाषणात शिवसेनेने भाजपला खांदा द्यावा, असे सांगितले. त्यावरुन मंचावर खसखस पिकली. नीलम गोºहे या विषयावर बोलताना पालखीला खांदा दिला जातो. याचा वेगळा अर्थ काढू नका, असे सांगितले. 

मंचावर बरोबरीच्या स्थानासाठी आग्रह - या मेळाव्याला शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सावंत बंधू, महेश कोठे, गणेश वानकर यांच्यासह सेनेच्या प्रमुख महिला पदाधिकाºयांना मंचावर स्थान मिळायला हवे, याबाबत सेनेचे पदाधिकारी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे पदाधिकारी आवर्जून सर्वांना मंचावर बोलावत होते.  विशेष म्हणजे शिवसेनेच्या शहर पदाधिकाºयांनी तानाजी सावंत आणि रावसाहेब दानवे या दोघांना स्वतंत्रपणे भले मोठे हार घालून त्यांचे स्वागत केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा