शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवाना काढण्यासाठी MBBS डॉक्टरांचे ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:14 IST

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती

सोलापूर - चाळीस वर्षापुढील व्यक्तींना वाहन परवाना काढताना डॉक्टराचे फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. आतापर्यंत आरटीओ कार्यालयाजवळ बसलेला एकच डॉक्टर दिवसातून असे पन्नास प्रमाणपत्र देत होता, पण यापुढे आता एमबीबीएस डॉक्टरचे ऑनलाईन सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आले आहे. एमबीबीएस डॉक्टरला आरटीओ कार्यालयतर्फे यूडीआय नंबर दिला जाईल व तो डॉक्टर दिवसातून फक्त वीस जणांना प्रमाणपत्र देऊ शकेल, अशी सोय  करण्यात आली आहे, असे आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरटीओच्या सर्व सेवा ऑनलाइन करण्यात येत असल्याबाबत माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे उपस्थित होते. आरटीओच्या सर्व सेवा ऑनलाइन करण्यात येत आहे. वाहनांची नोंदणी ते दंडाची रक्कम ऑनलाईन भरता येणार आहे. वाहन घेताना तुम्ही दिलेला मोबाईल नंबर चालू आहे का  नाही ते तपासा अन्यथा दंडाचा भुर्दंड तुम्हाला बसण्याची शक्यता असल्याचेही ढाकणे यांनी सांगितले. 

 

वाहनाचा मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करता येणार 

वाहन खरेदी करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर पुढील कारवाईचे संदेश दिले जातात. तुम्ही एखाद्यावेळी नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन थांबवले असेल किंवा सिग्नल तोडल्यानंतर वाहतूक पोलीस थेट नंबर प्लेटचा फोटो घेऊन ऑनलाइन कारवाई करतात. याबाबत तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर संदेश दिला जातो. पण वाहन नोंदणीच्या वेळी जर डीलर्स किंवा एजंटचा नंबर दिलेला असेल तर हा संदेश तुम्हाला मिळत नाही किंवा कालांतराने तुम्ही सिमकार्ड बदलले असेल तर या कारवाईचा संदेश तुम्हाला मिळत नाही।. त्यामुळे कारवाईच्या वेळी आकारलेल्या दंडावर विलंबाचा शुल्क लागत जातो. यामुळे तुम्हाला दंडाचा मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने आता वाहन खरेदीवेळेला नोंदणी केलेला मोबाईल नंबर बंद असेल तर तुमचा चालू मोबाईल नंबर अपडेट करण्याची सोय केली आहे. घरबसल्या तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर अपडेट करता येईल. भविष्यात ही समस्या जाणवू नये यासाठी यापुढे वाहन नोंदणी करताना आधार कार्ड व पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस