शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीमातेचे ऑनलाइन बुकिंग दर्शन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:53 AM

नाताळनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी; पदस्पर्श दर्शन रांग धोंडोपंत महाराज मठापर्यंत

ठळक मुद्देपदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून २ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाइन बुकिंग दर्शन सुविधा बंद दर्शन रांग जलद गतीने पुढे जावी, यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत मंदिर समितीच्या सर्व कर्मचाºयांची रजा आणि साप्ताहिक सुट्टी रद्द

पंढरपूर : सफला एकादशी आणि नाताळनिमित्त अनेक जण सुट्टी घेऊन देवदर्शनासाठी प्रवास करीत आहेत. परिणामी पंढरपुरातही श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे़ लवकर दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने ऑनलाइन बुकिंग दर्शन सेवा बंद केली आहे.

रविवारी एकादशी असल्याने पदस्पर्श दर्शन रांग ही धोंडोपंत महाराज मठापर्यंत गेली होती. दरम्यान, नाताळ सण दोन दिवसांवर आल्याने या सणाच्या सुट्टीच्या निमित्ताने पंढरपूर दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्याही वाढली आहे. रविवारी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, नगरप्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजून गेला होता. 

नाताळ सणाच्या काळात अनेक जण सुट्टी काढून पर्यटन तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपूर शहरात राज्य-परराज्यातून दर्शनासाठी भाविक येत आहेत. शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास भाविकांनी गजबजले आहे. या ठिकाणी माफक दरात चांगली सुविधा मिळत असल्याने अनेक जण मुक्कामी येतात.

 चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि त्यानंतर विठ्ठलाचे पदस्पर्श किंवा मुखदर्शन असा भाविकांचा दिनक्रम असतो. गेल्या तीन दिवसांत पंढरीत येणाºया भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

मंदिर समिती कर्मचाºयांच्या सुट्ट्या बंद- पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून २ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाइन बुकिंग दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दर्शन रांग जलद गतीने पुढे जावी, यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत घेण्यात येत आहे. मंदिर समितीच्या सर्व कर्मचाºयांची रजा आणि साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर