शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापुरात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच; खरेदीदार व्यापाºयांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 5:03 PM

घसरण सुरूच; खरेदीदार व्यापाºयांची घटली संख्या, केवळ १३७ टन आवक

ठळक मुद्देकांद्याची दररोजची आवक २८० ट्रकपर्यंत गेली दरात वाढ होत नसल्याने शेतकºयांपुढे अर्थसंकटकांदा विक्रीसाठी आणावा की नको?, असे शेतकरी विचार करु लागले

सोलापूर: सोलापूरबाजार समितीमध्ये कांद्याची आवक दररोज कमी होत असतानाही दरात वाढ होत नसल्याने शेतकºयांपुढे अर्थसंकट उभारले आहे. कांदा विक्रीसाठी आणावा की नको?, असे शेतकरी विचार करु लागले आहेत.

मागील आठवड्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दराची घसरण सुरू आहे. कांद्याची आवक वाढल्यानंतर दराची घसरण सुरू राहणे स्वाभाविक आहे, मात्र आवक वरचेवर कमी होत असतानाही दर वाढत नाही. दिवाळी सणानिमित्तची सुट्टी संपल्यानंतर कांदा खरेदीसाठी व्यापाºयांची संख्या वाढते, असे सांगितले जाते. खरेदीदार व्यापाºयांची संख्या वाढल्याने खरेदीसाठी स्पर्धा होऊन दरातही वाढ होते, अशी एक धारणा आहे. मात्र सध्या तशी स्थिती नाही. मागील आठवड्यापासून कांद्याची दररोजची आवक २८० ट्रकपर्यंत गेली आहे.

कधी २८०, कधी २७०, कधी २४० याप्रमाणे कांद्याची आवक घसरत गेली आहे. सोमवारी २७० ट्रक तर मंगळवारी अवघा १३७ ट्रक कांद्याची आवक बाजार समितीमध्ये झाली होती. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ५० टक्के कांदा विक्रीसाठी आला होता. असे असतानाही दरात वाढ झाली नाही. मागील आठवड्यापासून सुरू असलेला दराचा खेळ मंगळवारीही दिसून आला. एका शेतकºयाच्या काही निवडक कांद्याला क्विंटलला १७१० रुपये दर आला. अन्य कांदा मात्र १०० रुपयांपासून विक्री झाला. सरासरी ६०० रुपयेच दर राहिला. विशेष म्हणजे बुधवारी बाजाराला सुट्टी असल्याने शिवाय मंगळवारी कांद्याची आवक कमी झाल्याने अधिक दर मिळणे अपेक्षित होते. मात्र व्यापाºयांच्या एकीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांचे मरण सुरू आहे. 

यावर्षी पाऊस नसल्याने पाण्याची टंचाई असताना असलेल्या पाण्यावर अन्य पिके टाळून केवळ कांदा पीक शेतकºयांनी जोपासना केली. केवळ कांद्याच्या विक्रीतून चार पैसे मिळतील ही शेतकºयांची अपेक्षा असताना कांदा बाजारात आणण्यासाठी होणारा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

मजुरीही निघत नाही..कांदा लागवडीसाठी लागणारे रोप, लागवडीसाठी होणारी मजुरी, त्यासाठी खत, फवारण्या, शेतकरी कुटुंबाचे श्रम, कांदा लागवडीसाठी होणारा खर्च व कांदा भरण्यासाठी आवश्यक पोती यांचा खर्च प्रत्येक शेतकºयाचा वेगवेगळा आहे. या खर्चाचा विचार करता सध्या मिळणारा दर पाहता खर्च न केलेला बरा. परंतु कांदा विक्रीसाठी होणारा वाहतूक खर्च, हमाली तोलाई व अन्य बाजार समितीमधील  खर्चही कांदा विक्रीतून निघत नाही. अशाने शेतकरी थोडाच नफ्यात येणार आहे?

मोजून कांद्याला पाणी दिले. कांद्याचे उत्पादन येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करुन खर्च केला. आता कांदा बाजारापर्यंत घेऊन जायचेही परवडत नाही. क्विंटलला दीड हजारापेक्षा अधिक दर मिळाला तर किमान तोटा तरी होत नाही.- घनशाम गरड, कांदा उत्पादक 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेती