रुग्णसंख्या घटल्याने शहरात एक हजार कोविड बेड्स रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST2020-12-05T04:42:17+5:302020-12-05T04:42:17+5:30
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला ...

रुग्णसंख्या घटल्याने शहरात एक हजार कोविड बेड्स रिकामे
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोनासाठी आरक्षित असलेले बेड हे इतर आजारासाठी देण्यात आलेले नाहीत. यासाठी नियमावली ठरवली असून कोरोना रुग्णांना रुग्णालयात प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान एकही मृत्यू झाला नाही. शहरासोबत ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. तसेच जिल्ह्यात मृत्यूची संख्या कमी होत आहे.
--------
कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी आपल्या सर्वांना काळजी घ्यावीच लागणार आहे. इतर आजाराच्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीदेखील कोरोना रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. औषधेही पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहेत.
- डॉ. प्रदीप ढेले,
जिल्हा शल्यचिकित्सक