खोटा एसएमएस व चेक देऊन एकास ६५ हजाराला फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST2021-03-25T04:21:42+5:302021-03-25T04:21:42+5:30
याबाबत उद्धव शामराव माने (रा. वाढेगांव ता. सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रणधीर राजेंद्र भोसले (रा. खानविलकरवाडा-जत, जि. ...

खोटा एसएमएस व चेक देऊन एकास ६५ हजाराला फसविले
याबाबत उद्धव शामराव माने (रा. वाढेगांव ता. सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रणधीर राजेंद्र भोसले (रा. खानविलकरवाडा-जत, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वाढेगांव (ता. सांगोला) येथील उद्धव माने यांचा रणधीर भोसले याने विश्वास संपादन केला. ३ ते ४ फेब्रुवारी रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा, सांगोला ग्राहक सेवा केंद्र, वाढेगाव व फिनो बॅक या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात खोट्या एसएमएसद्वारे व खोटा चेक देऊन वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगत ६५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. तपास पोलीस नाईक अभिजीत मोहोळकर करीत आहेत.
सांगोला येथील खंडोबा ज्वेलर्स सराफाचा विश्वास संपादन करून सुमारे १ लाख ७० हजार ६६४ रुपयांच्या ३२.८२० ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करून खोट्या एसएमएसद्वारे व खोटा चेक देऊन फसवणूक केली होती. पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीने तपास करून रणधीर भोसले या आरोपीस अटक केली आहे. त्याने सदरचे सोने सांगोल्यातील ओम ज्वेलर्समध्ये तारण ठेवून पैसे घेतले होते. ते सोने हस्तगत केले आहे. त्याच्याकडून फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी सांगितले.