शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

एका रात्रीत चार एकरांतील ज्वारीची कणसे गेली चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:07 IST

ब्रह्मपुरीतील प्रकार; ज्वारीच्या कोठारात चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ

ठळक मुद्दे- मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी शिवारातील घटना- चार एकर ज्वारीवर दरोडा टाकण्याची ही पहिलीच घटना- शेतकºयाने दिली मंगळवेढा पोलीसात फिर्याद

मंगळवेढा : ब्रह्मपुरी (ता़ मंगळवेढा) येथे अज्ञात चोरट्यांच्या टोळीने शेतकरी दादासाहेब कोकरे यांच्या पाच एकर शेतातील तब्बल चार एकरांवरील ज्वारीची कणसे खुडून नेली. यामुळे शेतकºयाचे तब्बल ५० पोती ज्वारीचे नुकसान झाले आहे. 

गेली तीन वर्षे दुष्काळाने रब्बी व खरीप हे दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेले. यावर्षी चांगला पाऊस झाला असल्याने ज्वारीचे पीक जोमदार आले आहे. ज्वारीला चांगला दर मिळेल ही अपेक्षा आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या कष्टावर आयता डल्ला मारणाºया चोरांच्या टोळीने शेतकºयाला हैराण केले आहे. या चोरीने शेतकरी भयभीत झाला आहे.

ब्रह्मपुरी येथील दादासाहेब कोकरे हे शेताकडे गेले असता त्यांना आपल्या चार एकर शेतातील ज्वारीची कणसे चोरट्यांनी तोडून नेल्याचे  दिसून आले. हे पाहून त्यांना धक्काच बसला. काही वेळ काय करावे, हे सूचेनासे झाले. त्यांनी तडक मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले व या ज्वारीच्या चोरीची फिर्याद  दिली. 

घरफोडी, दुकानातील चोरी, महिलांच्या अंगावरील दागिने, चोरीच्या घटनांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. सध्या सुगीचे दिवस असून, पोलिसांनी ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, बोराळे, मंगळवेढा शिवारात गस्त वाढवावी, अशी शेतकºयांतून मागणी होत आहे. 

ब्रह्मपुरी शिवारात अशाप्रकारे चार एकर ज्वारीवर दरोडा टाकण्याची ही पहिलीच घटना आहे. पोलिसांचा वचक कमी झाला आहे. या ज्वारी दरोड्याचा जोपर्यंत उलगडा होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. या दरोड्यातील आरोपी तत्काळ गजाआड करून शेतकºयांना दिलासा द्यावा. - विकास पुजारी, शेतकरी ब्रह्मपुरी

 

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरagricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी