Solapur: एकच मिशन..जुनी पेन्शन! पदयात्रेत कर्मचाऱ्यांची घोषणा!
By रवींद्र देशमुख | Updated: February 25, 2023 14:09 IST2023-02-25T14:07:58+5:302023-02-25T14:09:03+5:30
Old Pension : 'एकच मिशन जुनी पेन्शन.. जुनी पेन्शन!' या घोषणेने आज जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पदयात्रेत ही घोषणा देण्यात आली.

Solapur: एकच मिशन..जुनी पेन्शन! पदयात्रेत कर्मचाऱ्यांची घोषणा!
- रवींद्र देशमुख
सोलापूर: 'एकच मिशन जुनी पेन्शन.. जुनी पेन्शन!' या घोषणेने आज जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पदयात्रेत ही घोषणा देण्यात आली.
कर्मचारी संघटनांच्या लढ्याची दिशा येत्या काळात कशी असावी, कर्मचाऱ्यांची भूमिका काय असावी यावर मार्गदर्शन या मेळाव्यात झाले.
रंगभवन सभागृहात मेळावा झाला. सकाळी ९:३० वाजता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हा परिषद पूनम गेट मार्गे शिवछत्रपती रंगभवन सभागृह पर्यंत पायी पदयात्रा काढली गेली. घोषणाबाजी करून शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधण्यात पदयात्रा यशस्वी ठरली.