कुरुलजवळील अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST2021-03-16T04:23:18+5:302021-03-16T04:23:18+5:30
कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आठवले (रा. मुळगाव वडदेगाव, ता. मोहोळ सध्या रा. सय्यद वरवडे) हा सोलापूर येथील सिव्हिल ...

कुरुलजवळील अपघातात एक ठार
कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आठवले (रा. मुळगाव वडदेगाव, ता. मोहोळ सध्या रा. सय्यद वरवडे) हा सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले नातेवाईक सचिन कुचेकर यांना भेटण्यासाठी आबा माने (रा. सय्यद वरवडे) यांच्यासोबत दुचाकीवरून एमएच १४ एचझेड ३५४५ निघाला होता. यावेळी मोहोळ-मंद्रुप राष्ट्रीय महामार्गावरील कुरुल येथील जाधव यांच्या शेताजवळ समोरुन आलेल्या अज्ञात वाहनाने ठोकरल्याने किशोर आठवले (वय २०) हा जागीच ठार झाला तर आबा बाळू माने (वय २१) हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची खबर मयताचे मामा सुनील सुखदेव कुचेकर यांनी पोलिसात दिली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कामती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जीवराज काशीद हे करीत आहेत.
फोटो
१५किशोर आठवले-अपघात