जावांच्या भांडणात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:18+5:302021-04-27T04:23:18+5:30

शोभा ज्ञानेश्वर पोळ या २६ एप्रिल रोजी सकाळी ६ च्या सुमारास सामाईक जमिनीमध्ये बांधलेल्या जनावरांचे शेण काढीत होत्या. त्यावेळी ...

One injured in Java quarrel | जावांच्या भांडणात एक जखमी

जावांच्या भांडणात एक जखमी

शोभा ज्ञानेश्वर पोळ या २६ एप्रिल रोजी सकाळी ६ च्या सुमारास सामाईक जमिनीमध्ये बांधलेल्या जनावरांचे शेण काढीत होत्या. त्यावेळी थोरली जाऊ पुष्पा रामचंद्र पोळ हिने त्या ठिकाणी येऊन तू इथे जनावरे बांधायची नाहीत, अशी म्हणाली असता शोभाने मी या ठिकाणी जनावरे बांधणार! या जमिनीचा वाद कोर्टात चालू आहे. निकाल लागल्यानंतर बघू, असे सांगितले. यावेळी पुष्पाचा मुलगा करण पोळ व काजल धुमाळ या दोघांनी शोभाला शिवीगाळ, दमदाटी केली. तर करणने जवळच पडलेल्या वेळूच्या काठीने पाठीत मारहाण केली. जाऊ पुष्पा व काजल धुमाळ या दोघींनी हातातील दगड डोक्यात, हातावर मारून जखमी केले. सदरची भांडणे अक्षय धुमाळ व प्रभाकर पोळ यांनी सोडवासोडवी केली. याबाबत शोभा पोळ (रा. घेरडी,पोळ वस्ती) यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पुष्पा रामचंद्र पोळ, करण रामचंद्र पोळ व काजल लखन धुमाळ या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One injured in Java quarrel