पाचजणांची एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:18 IST2021-01-14T04:18:54+5:302021-01-14T04:18:54+5:30

वाढेगाव नाका येथील सद्दाम मणेरी यांच्या हॉटेलमध्ये रोहित काळे हा तरूण बसला होता. दरम्यान रात्री ८.३०च्या सुमारास हॉटेलबाहेर ...

One of the five was beaten with batons | पाचजणांची एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

पाचजणांची एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

वाढेगाव नाका येथील सद्दाम मणेरी यांच्या हॉटेलमध्ये रोहित काळे हा तरूण बसला होता. दरम्यान रात्री ८.३०च्या सुमारास हॉटेलबाहेर भांडणाचा आवाज आल्याने त्याने बाहेर येऊन पाहिले. त्यावेळी त्यांच्या घराशेजारील दत्तात्रय जांगळे हा कल्पेश विलास जगताप याला शिवीगाळ करीत होता. यावेळी रोहित काळे याने तेथे जाऊन शिवीगाळ, भांडण कशाला करतो, अशी विचारणा केली. यावेळी दत्तात्रय याने तुला काय करायचे आहे, असे म्हणून त्याच्या कानाखाली मारून तुला परत दाखवतो, असे म्हणून तेथून निघून गेला.

मध्यरात्रीच्या सुमारास रोहितचा मित्र दत्तात्रय जांगळे, त्याचे वडील प्रभाकर महादेव जांगळे, चुलतभाऊ पल्या श्रीमंत जांगळे, आनंद रावसाहेब जांगळे यांच्यासह एका अनोळखी इसमाने रोहित बाहेर येताच त्याला शिव्या देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रभाकर जांगळे, पल्या जांगळे व आनंद जांगळे यांनी रोहित काळे यास लाथाबुक्क्याने मारहाण करत दोन्ही हात व पाय धरून ठेवले. त्यानंतर दत्तात्रय जांगळे याने लाकडी दांडक्याने रोहितच्या तोंडावर, डोक्याला व नाकावर जोराचा फटका मारल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी रोहितचा भाऊ गणेश हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्या अनोळखी व्यक्तीने तू का मध्ये चालला आहेस, असे म्हणून शिवीगाळ करून त्यालाही धरून ठेवले.

या भांडणाचा आवाज ऐकून रोहितची आई व वहिनी सोडा... वाचवा... असे जोराने ओरडू लागल्याने त्यांनी तेथून धूम ठोकली. या मारहाणीत रोहित काळे याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत रोहित काळे यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One of the five was beaten with batons