रेल्वे गाडीखाली सापडून एकाचा मृत्यू
By दिपक दुपारगुडे | Updated: March 2, 2024 19:09 IST2024-03-02T19:09:23+5:302024-03-02T19:09:33+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम रेल्वेखाली चिरडल्याची माहिती आरपीएफ जवानांना मिळाली.

रेल्वे गाडीखाली सापडून एकाचा मृत्यू
सोलापूर : धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना कुर्डूवाडी स्थानकावरील प्लॅटफाॅर्म क्र. तीनवरील डाउन ट्रॅक नं. ३ वर पूर्वी घडली. संदीप संभाजी ढेकळे (वय ४५, रा. वडाचीवाडी त. म., ता. माढा), असे अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम रेल्वेखाली चिरडल्याची माहिती आरपीएफ जवानांना मिळाली. त्यावेळी तातडीने त्यांनी रेल्वेच्या वैद्यकीय पथकाला घटनास्थळावर बोलावले. वैद्यकीय पथकाने त्याची पाहणी करून तो मृत असल्याचे घोषित केल्यानंतर मृतदेह रेल्वे गँगमनच्या मदतीने रेल्वे ट्रॅकमधून बाहेर काढण्यात आला. यावेळी मृताच्या खिशात एक डायरी व दि. १ मार्च रोजीचे सोलापूर-कुर्डूवाडी असे जनरल तिकीट आढळून आले. डायरीतील लिहिलेल्या फोन नंबरवरून मृताची ओळख पटविण्यात आली. डायरीमधील नंबरवर फोन करून त्याच्या नातेवाइकांना आरपीएफ जवानांनी बोलावून घेतले. त्यावेळी त्याने मृताचे नाव संदीप संभाजी ढेकळे असल्याचे सांगितले.