एका दिवसात डाळिंबाची
By Admin | Updated: August 5, 2014 01:23 IST2014-08-05T01:23:08+5:302014-08-05T01:23:08+5:30
१५ कोटींची उलाढाल

एका दिवसात डाळिंबाची
सांगोला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडतीला सोमवारी एकाच दिवशी तब्बल गणेश, भगवा, मृदूला वाणाच्या दर्जेदार २ लाख २० हजार किलो आणि १० हजार डाळिंबाच्या कॅरेटची आवक झाली. यातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडतीला सोमवारी एकाच दिवशी तब्बल गणेश, भगवा, मृदूला वाणाच्या दर्जेदार २ लाख २० हजार किलो आणि १० हजार डाळिंबाच्या कॅरेटची आवक झाली. यातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
दिल्ली, कानपूरसह अकोला, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दिवसभर गर्दी केली होती. दुष्काळी सांगोला तालुक्याची डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण झाल्याने तालुक्यात डाळिंबाची क्रांती झाली आहे. शेतकऱ्यांनी उजाड माळरानावर कमी पाण्यात विविध वाणाच्या डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने सांगोल्याच्या दर्जेदार डाळिंबाचा दबदबा सर्वत्र निर्माण झाला आहे.
बाजार समितीमध्ये १७ पेक्षा अधिक अडत व्यापारी खरेदीदार असल्यामुळे इतर राज्यातील व्यापाऱ्यांची डाळिंबाच्या खरेदीसाठी सांगोल्यात मोठी रेलचेल असते. इतर ठिकाणच्या बाजार समितीमध्ये डाळिंबाची आठ भागात प्रतवारीची छाटणी केल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही, यामुळे शेतकरीवर्ग सांगोल्याच्या अडतीला डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक करत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
१० हजार कॅरेटची विक्री
सोमवारी अचानक सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अहमदनगर, इंदापूर, श्रीगोंदा, बारामती, फलटण, गोंदवले, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, माळशिरस, पंढरपूर या भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक आली. गणेश, भगवा व मृदूला वाणाची १० हजार कॅरेट एकाच दिवशी अडतीला आल्याने व्यापारीही अवाक् झाले. २२ किलो कॅरेटमधील ३ प्रतवारीत व्यापाऱ्यांनी ६० ते ८० रु. किलो दराने दर्जेदार डाळिंबाची खरेदी केली.