विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:23 IST2021-05-26T04:23:45+5:302021-05-26T04:23:45+5:30

कुसळंब : शेतात जाऊन फिरून येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील गाताचीवाडी ...

An old man drowned in a well | विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू

विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू

कुसळंब : शेतात जाऊन फिरून येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील गाताचीवाडी शिवारात हा प्रकार घडला.

साधू उमराव घाडगे (६५, रा. गाताचीवाडी, ता. बार्शी) असे मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा बाबासाहेब घाडगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान साधू घाडगे हे शेतात जाऊन फिरून येतो असे सांगून निघून गेले. त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. सर्वांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते कोठेही आढळून आले नाहीत. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावातील गरदडे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला.

Web Title: An old man drowned in a well