शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू

By appasaheb.patil | Updated: September 5, 2022 17:03 IST

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना भरला दम

सोलापूर : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छतेला महत्त्व द्या. कागदपत्रात न अडकता रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आज नातेपुते (ता. माळशिरस) येथे केले. अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू असा दम तानाजी सावंत यांनी भरला.

आरोग्यमंत्री सावंत यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार राम सातपुते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, आता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मोरे, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता व्होरा, माळशिरसचे वैद्यकीय अधीक्षक मझहर काझी  आदीसह अधिकारी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. प्रा. सावंत यांनी ओपिडी रजिस्टर, औषध साठा, रुग्णांचा प्रकार याची प्रत्यक्ष माहिती घेऊन सूचना केल्या. औषधावरील तारीख स्वतः त्यांनी तपासून पाहून मुदतबाह्य औषधे न ठेवण्याच्या सूचना केल्या.

रुग्णालय स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी नेमाप्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून दोन व्यक्ती स्वच्छतेसाठी नेमण्याचे निर्देश श्री सावंत यांनी दिले. त्या कर्मचाऱ्यांना दीडशे रुपयाऐवजी वाढवून पैसे द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना अग्निशमनचे प्रशिक्षण द्यावेरुग्णालयात आगीचे प्रकार घडत आहेत, ग्रामीण रुग्णालयानी फायर ऑडिट करून घ्यावे. तज्ज्ञमार्फत  अग्निशमनविषयी प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

रुग्णालयात ठिकठिकाणी फलक लावावेतरुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. रुग्णांना कुठे काय आहे, याची माहिती समजण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत ठिकठिकाणी कायमस्वरूपी सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ॲडमिट रुग्णांजवळ रोगनिदान कागद ठेवावारुग्णालयात रुग्ण डमिट होतो. ऍडमिट झालेल्या ठिकाणी रुग्णाला काय आजार आहे, उपचार काय सुरु आहेत. याबाबत त्याच्या कॉटजवळ रोगनिदान कागद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

रुग्णांची केली विचारपूसनातेपुते आणि माळशिरस दोन्ही ठिकाणी श्री सावंत यांनी पुरुष आणि स्त्री रुग्ण कक्षाला भेट देवून रुग्णांची विचारपूस केली. काय मावशी...काय बाबा... आता बरं आहे का... कधी ऍडमिट झाला.... कोणी तपासलं... औषधे घेतली का... अशी चौकशी त्यांनी केली. यावर रुग्णांनी समाधानकारक उत्तर दिले.

कोविड लसीकरणावर भर द्या..कोविडचा प्रादुर्भाव कमी वाटत असला अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. यामुळे कोरोना लसीकरण करून घ्यावे. काही नागरिकांनी पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. अशा नागरिकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यTanaji Sawantतानाजी सावंतGovernmentसरकार