शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

उजनीवर समुद्रपक्ष्यांची भरली जत्रा, गोड्या पाण्याचा घेत आहेत आस्वाद, मासेमारी करणारे स्थंलारित पक्षीही दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:56 PM

समुद्रातील खाºया पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनीतील गोड्या पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले आहेत. हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील जलस्थानावर वीण घालून व नेहमी भारतीय उपखंडाच्या पश्चिम व पूर्व सागरी किनारपट्टीवर मत्स्याहार करत उदरनिर्वाह करणारे अनेक प्रकारचे सिंगल अर्थात समुद्रपक्षी उजनीवर हिवाळ्यात दरवर्षी येतात.

ठळक मुद्देउजनी धरणातील विस्तृत पाणफुगवठ्यावर मासेमारी करणारे गळ पक्षी दाखल तीन-चार महिन्यांच्या येथील वास्तव्यानंतर मान्सूनच्या प्रारंभी आपल्या वंशाभिवृद्धीसाठी मूळस्थानी परततातसमुद्रातील खाºया पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनीतील गोड्या पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले

आॅनलाइन लोकमत सोलापूरकरमाळा दि १२ : स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी म्हणून परिचित असलेल्या उजनी धरणातील विस्तृत पाणफुगवठ्यावर मासेमारी करणारे गळ पक्षी लक्षणीय संख्येने येऊन दाखल झाले आहेत. नेहमी समुद्रावर वावर असलेले हे मत्स्याहारी पक्षी जलाशयाच्या सर्व भागात आढळून येत आहेत. समुद्रातील खाºया पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनीतील गोड्या पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले आहेत. हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील जलस्थानावर वीण घालून व नेहमी भारतीय उपखंडाच्या पश्चिम व पूर्व सागरी किनारपट्टीवर मत्स्याहार करत उदरनिर्वाह करणारे अनेक प्रकारचे सिंगल अर्थात समुद्रपक्षी उजनीवर हिवाळ्यात दरवर्षी येतात. त्यापैकी ब्लॅक हेडेड गल्स सध्या करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली, टाकळी, कात्रज, केत्तूर, शेळगाव, वांगी, कंदर या भागातील जलाशयाच्या पसरलेल्या पाणपृष्ठावर विपुल प्रमाणात वावरताना दिसत आहेत. स्थलांतर करून आलेले हे मत्स्यप्रिय विहंग पुढील तीन-चार महिन्यांच्या येथील वास्तव्यानंतर मान्सूनच्या प्रारंभी आपल्या वंशाभिवृद्धीसाठी मूळस्थानी परततात.आकाराने ब्राह्मणी घाराएवढे असलेले ब्लॅक हेडेड गल्स सध्या पांढरेशुभ्र वाटतात. परंतु काही दिवसात त्यांच्या डोक्यावर काळा डाग तयार होतो. नंतर उन्हाळ्यात डोक्याचा रंग काळसर तपकिरी होतो. या पक्ष्यांमध्ये पंखातील अग्रभाग पांढरा असतो व त्यांची किनार काळसर असते. चोच पिवळ्या रंगाची असते. चोचीचे अग्रटोक काळसर असते.---------------------स्थलांतरित बदकेही मासेमारी करतात : कुंभार- यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा दर्जा उत्तम झाला असून त्यामुळे माशांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तम प्रतीचे मासे उपलब्ध होत असल्यामुळे या वर्षी गळ पक्षी विपुल प्रमाणात आले आहेत. येत्या काही दिवसांत उजनी जलाशयावर विविध स्थलांतरित बदकेही मासेमारी करण्यासाठी येतील असे मत पक्षी अभ्यासक अरविंद कुंभार यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरण