उजनीच्या पाण्यासाठी पुण्याच्या बैठकीस जाणाऱ्या कार्यकर्त्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:25+5:302021-05-11T04:23:25+5:30

उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजुरी मिळवल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. उजनी धरण पाणी बचाव ...

Obstruction of activists going to Pune meeting for Ujani water | उजनीच्या पाण्यासाठी पुण्याच्या बैठकीस जाणाऱ्या कार्यकर्त्यांची अडवणूक

उजनीच्या पाण्यासाठी पुण्याच्या बैठकीस जाणाऱ्या कार्यकर्त्यांची अडवणूक

Next

उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजुरी मिळवल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून जनहितचे प्रभाकर देशमुख, अतुल खुपसे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांनी उजनी जलाशयात ‘जलसमाधी आंदोलन छेडले होते. यावर प्रशासनाने पालकमंत्र्यांसमवेत पुण्यात सिंचन भवन येथे १० मे रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीचे पत्र बचाव समितीला दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना भीमानगर चेकपोस्टवर पोलिसांना अडवले.

बैठकीला जाऊ नये यासाठी मज्जाव करण्यात आला. वेळेवर पोचण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला.

परंतु प्रभाकर भैय्या देशमुख व उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती सचिव माऊली हळवणकर हे पुणे सोलापूर हायवेने जात असताना त्यांना अडवून त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना अडवून जाऊ दिले नाही. फक्त तिंघाना सोडण्यात आले.

यावर कार्यकर्त्यांना नाहक त्रास देऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्याचा आल्याचा आरोप उजनी धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला. तर हिकडे अतुल खुपसे व त्याचे सहकारी दुसऱ्या मार्गाने म्हणजेच करमाळा भिगवण रोडने गेले असता त्यानांही डिकसळच्या पुलावर अडवले. ५० पोलिसांचा फौज फाटा येथे तैनात होता. तब्बल तासभर त्यांना मज्जाव करण्यात आला. तर पंढरपूर व मंगळवेढ्यातील संघटनेचे कार्यकर्ते नरसिंहपूर, बावडा,बारामती या मार्गाने गेले. काही कार्यकर्ते आदल्या दिवशीच पुणे येथे जाऊन थांबले होते. सर्वजण पुणे येथे उशिरा का होईना पण बैठकीला दाखल झाले.

----

शासनानेच बोलावले तरी विरोध कराय काय?

शासनानेच बैठक आयोजित केली. बैठकीचे निमंत्रण दिले आहे, मग शासनाचेच अधिकारी बैठकीला जाण्यासाठी विरोध करतात. मी काय दरोडेखोर वाटतोय का तुम्हाला? मी एक समाजसेवक आहे. अशा शब्दात उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल यांच्याकडे आपला संताप व्यक्त केला.

-----

इंदापूर तालुक्यातील शेतकरी अगोदरच सिचंन भवनला हजर होते. त्यांना बैठकीला बोलावण्याचे काय कारण होते. त्यांना का अडवत नाही? आम्हालाच का फक्त पदाधिकाऱ्यांना बोलावण्याची अटक घातली गेली.

- अतुल खुपसे, अध्यक्ष, उजनी धरण संघर्ष समिती

---

आमची भाकरी पळवू नका म्हटले आपण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना म्हटले तर इंदापूर तालुक्यातील शेतकरी बैठकीतच माझ्या अंगावरवरच धावून आले.

- विठ्ठल मस्के, सदस्य, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

Web Title: Obstruction of activists going to Pune meeting for Ujani water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.