शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कोरोनाग्रस्तांच्या सेवेनंतर परिचारिका माता घरी परतली; आईला पाहताच चिमुकल्यांनी मिठीच मारली...!

By appasaheb.patil | Updated: June 7, 2020 09:55 IST

वीस दिवसानंतर घरी; सुनेच्या कौतुकाने सासूही भावूक, रहिवाशांनी केले जंगी स्वागत

ठळक मुद्देकोरोना ग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकेचे स्वागतगुलमोहर अपार्टमेंटमध्ये स्वागत सोहळासोलापुरातील कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी सर्वजण तत्पर

सुजल पाटील

सोलापूर : कोरोनाच्या संकट काळात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून तिने रूग्णसेवाच केली तब्बल १५ दिवसानंतर घरी परतल्यावर आईला पाहताच चिमुकल्यांना रडू आवरेना...व्याकुळ झालेल्या आईने त्यांना कुशीत घेतले...आपल्या पत्नीच्या कार्याचे कौतुक होत असल्याचे पाहून पतीचेही डोळे पाणावलसुनेचे कौतुक पाहून सासुही भावूक झाली...हे दृष्य पाहून गुलमोहोर अपार्टमेंटमधील उपस्थित रहिवाशांना गहिवरून गेले.झाले असे की, कोरोना संकट काळात पुना नाका परिसरातील गुलमोहोर अपार्टमेंटमध्ये राहणारी व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात कोविड सेंटरमध्ये दिवसरात्र रूग्णसेवा करणारी दीपाली उमेश जाधव-डांगे. तिने आपल्या कुटुंंब आणि रूग्णसेवा या दोघांनाही तितकेच महत्व देत कोरोना काळातील प्रसंग कथन केला. 

सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच होते. त्यामुळे प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये कार्यरत असणाºया सर्व कर्मचाºयांना तिथेच निवासाची सोय केली, त्यामुळे घरी जाता आले नाही, मात्र घरातून दोन्ही चिमुकल्यांचा दररोजच फोन यायचा ‘मम्मी तू कोठे आहेस...घरी का येत नाही, तुझी खूप आठवण येतेय...तू कधी येणार’ हे वाक्य कानी पडल्यानंतर रडू यायचे. पण परिस्थितीच अशी होती की, मी घरी जाऊच शकत नव्हते. पती व सासु यांनाच मुलांची काळजी घ्य...क़ुठे बाहेर फिरू देऊ नका... त्यांना समजावून सांगा...मी लवकरच घरी येते असे सतत फोनवरून सांगून धीर देण्याचा प्रयत्न केला़ हे बोलणे माझ्यासाठी सोप्पे होते पण मायलेकरांमध्ये असलेल्या नात्यातील दुरावा टिकवून ठेवणे खुप अवघड होते. १५ दिवसांच्या सेवेनंतर त्या क्वारंटाईन झाल्या त्यानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या घरी दाखल झाल्या. घरी दाखल होताच गुलमोहर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्यांचे जोरदार स्वागत करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे काम केले़ यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे, आशुतोष बरडे यांच्यासह अन्य रहिवाशी उपस्थित होते.----------परिचारिका दीपा जाधव - डांगे यांच्याविषयी....

दीपा जाधव - डांगे यांनी आपले प्राथमिक शिक्षण मॉर्डन हायस्कुल तर पदवीचे शिक्षण वालचंद महाविद्यालयात पूर्ण केले़ रूग्णसेवेची आवड असल्याने त्यांनी मुंबई येथील जे. जे. हॉस्पीटलमध्ये नर्सिंगचा डिग्री कोर्स केला. त्यानंतर २००८ साली त्या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर येथे रूजू झाल्या. दीपा जाधव यांचे पती उमेश जाधव हे रेल्वे विभागात तिकीट तपासणी अधिकारी आहेत़ त्यांना दोन लहान मुले आहेत. त्या सध्या शासकीय रूग्णालयात कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहेत.---------------मागील १२ वर्षाच्या काळात मला हजारो रूग्णांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले़ सेवा करीत असताना कोणी आशिर्वाद दिला तर कोणी माझ्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली़ रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून मी काम केले. यात मला माझ्या घरच्यांची साथ होती. शिवाय गुलमोहोर अपार्टमेंटमधील रहिवाशांनीही वेळोवेळी मला मदत केली़ यापुढेही कोरोनाविरूध्दच्या लढाईत मी सक्षमपणे लढण्यास तयार आहे.- दीपा जाधव-डांगे,परिचारिका, सिव्हिल हॉस्पीटल, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर