शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

आता सोलापूरातील बँकामध्ये होणार आधार नोंदणी, ११ बँकांमध्ये आधार नोंदणी सुरू उर्वरित २९ ठिकाणी महिनाअखेर होणार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:31 PM

नव्याने आधार नोंदणी करणे आणि व्यक्तिगत माहिती अपडेट करण्याच्या कामास आणखी गती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ४० बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात  निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेतलीस्टेट बँक आॅफ इंडियासह इतर बँकांनी आधार नोंदणी केंद्र सुरू केलेअद्यापही इतर काही बँकांनी या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत एजन्सीमार्फत काम सुरू करावे, अशा सूचना तेली यांनी केल्या

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : नव्याने आधार नोंदणी करणे आणि व्यक्तिगत माहिती अपडेट करण्याच्या कामास आणखी गती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ४० बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ११ बँक शाखांमध्ये आधार केंद्र सुरू झाले आहे. उर्वरित २९ ठिकाणी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्यात यावेत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी  बँकेच्या व्यवस्थापकांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात  निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली. यावेळी युआयडीएचे अभिषेक पांडे, महा-ई-सेवाचे जिल्हा समन्वयक शशिकांत इगवे आदी उपस्थित होते. स्टेट बँक आॅफ इंडियासह इतर बँकांनी आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे. अद्यापही इतर काही बँकांनी या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत एजन्सीमार्फत काम सुरू करावे, अशा सूचना तेली यांनी केल्या. -------------------येथे होणार सुरू-  बँक, अ‍ॅक्सिस बँक : कन्ना चौक शाखा. बँक आॅफ बडोदा. बँक आॅफ इंडिया : मंगळवेढा, पंढरपूर, अकलूज, माळशिरस, माढा, सांगोला, रेल्वेलाइन सोलापूर. बँक आॅफ महाराष्ट्र : अक्कलकोट, बार्शी, अकलूज, जुळे सोलापूर. कॅनरा बँक : चाटी गल्ली, सेंट्रल बँक आॅफ इंडिया : बार्शी, बाळीवेस सोलापूर. फेडरेल बँक. एचडीएफसी : होटगी रोड, मुरारजी पेठ. आयसीआयसीआय बँक : सोलापूर, आयडीबीआय बँक : सोलापूर, इंडस बँक : माढा, इंडियन ओयॉसीस : रेल्वेलाइन सोलापूर, पंजाब नॅशनल बँक : कस्तुरबा मार्केट सोलापूर. स्टेट बँक आॅफ इंडिया : मार्केट यार्ड, मंगळवेढा, न्यू पाच्छा पेठ, भुसार पेठ, रेल्वेलाइन, नातेपुते, माढा, कोळे, विजापूर रोड सोलापूर, पंढरपूर, करमाळा. सिंडिकेट बँक : सैफुल, युनियन बँक आॅफ इंडिया : कुंभार वेस. ---------------सर्वांना मिळेल सोय- बँक खात्यासाठी आधार जोडणी आवश्यक आहे. आधार क्रमांकाला मोबाइल क्रमांक वगैरे माहिती जोडलेली नसल्याने अडचणी येत आहेत. यावर तोडगा म्हणून बँकांमध्येच आधार केंद्र सुरू करण्यात येत आहेत. हे केंद्र खासगी एजन्सीमार्फत चालविले जाणार असल्याने केवळ बँकेचा खातेदार नव्हे तर सर्वच ग्राहकांना मदत करायची आहे. बँकांमधील एजन्सीने ग्राहकांना आधार नोंदणी अथवा माहिती अपडेट करण्याबाबत असहकार्य केल्यास युआयडीएकडे तक्रार करता येईल, असे संजय तेली यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय