शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आता सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी घेणार भाभा अणु संशोधन केंद्रात प्रशिक्षण अन् संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 17:00 IST

भाभा अणु संशोधन केंद्र व सोलापूर विद्यापीठात पंधरा प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि मुंबई येथील भारत सरकारच्या भाभा अणु संशोधन केंद्र यांच्यात विविध 15 प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या कार्यालयात सामंजस्य कराराची प्रक्रिया पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आकृती प्रोजेक्ट विभाग आणि भाभा अणु संशोधन केंद्राच्या आकृती टेक्नॉलॉजी विभागाच्या माध्यमातून 15 प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या सामंजस्य करारावर भाभा अणु संशोधन केंद्राच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी स्मिता मुळे आणि विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यावेळी विद्यापीठाच्या आकृती प्रोजेक्टच्या प्रमुख डॉ. अंजना लावंड या उपस्थित होत्या.

या पंधरा सामंजस्य करारामुळे विद्यार्थी आणि अभ्यासकांना येणाऱ्या काळात भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रशिक्षण घेण्याची व संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. या पंधरा प्रोजेक्टमध्ये प्रामुख्याने कृषी आणि ग्रामीण भागाशी विषय जोडली गेली आहेत. त्यात नॅनोटेक्नॉलॉजी, विविध फळांचे रेडिशनद्वारे संरक्षण, सोलार प्रकल्प, नैसर्गिक खत निर्मिती, केळी टिशू कल्चर, हळदीचे विविध प्रयोग, माती परीक्षण, पाणी शुद्धीकरण यंत्र, निमचा खतासाठी उपयोग इत्यादी विषयांवर करार झालेला असून याचा विद्यार्थी व शिक्षकांना संशोधन, प्रशिक्षण व नोकरीसाठी उपयोग होणार असल्याचा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरStudentविद्यार्थीEducationशिक्षण