शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:31 IST

अतुल भोसले : १५ लाख लिटर पाणी वाटपाची व्यवस्था

ठळक मुद्दे१५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्थावारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आलीसमाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम

पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात़ या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असून समितीने १५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्था उभी करण्याची तयारी केल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी दिली़

आषाढी वारी काळात दूषित पाण्यामुळे शेकडो भाविकांना डायरिया, गॅस्ट्रोसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. पंढरपुरात येणाºया भाविकांमध्ये वृद्धांची संख्या जास्त असते़ अशा भाविकांना दूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्रा काळात शहरात १२ ते १५ लाख भाविक येत असल्याने प्रशासनाकडून होत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने काही समाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने भाविकांना यंदा मिनरल वॉटर पिण्यास मिळणार आहे.यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री वारीदरम्यान दर्शन रांगेतील वारकºयांना स्वच्छ पाणी व चहाची मोफत सोय करण्यात आली होती़ मात्र यंदा प्रथमच दर्शन रांगेसह मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, भाविकांसाठी उभारलेल्या ६५ एकर परिसरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मिनरल वॉटर वितरणाची व्यवस्था समितीने करण्याचे नियोजन केल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. याशिवाय यंदाही दर्शनासाठी येणाºया भाविकांचा विमा मंदिर समितीकडून उतरविण्यात येणार असून याचा भाविकांना दुर्घटनेच्यावेळी उपयोग होणार आहे. शहरातील १५ ठिकाणी समितीने मोठे एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ यावर विठ्ठल गाभाºयातील देवाचे दर्शन २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. गेल्या आषाढी दशमीला मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीची घोषणा केली होती़ यावर्षी नवीन समितीला काम करण्यासाठी ही पहिलीच यात्रा मिळाल्याने वारकºयांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा निर्णय समिती घेणार असल्याचे डॉ़ भोसले यांनी सांगितले.अध्यक्षांनी केली पत्राशेडची पाहणीच्आषाढी यात्रेमध्ये दर्शनास येणाºया भाविकांच्या सुविधेकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ‘श्री’च्या पदस्पर्श दर्शन रांगेत पत्राशेड येथे उभ्या असलेल्या भाविकांना पायास खडे टोचू नयेत, यासाठी प्रथमच २४,००० चौरस फूट इतके मॅट टाकण्यात आले आहे़ त्याची पाहणी बुधवारी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी केली़ त्यांच्यासमवेत मंदिर समितीचे संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीWaterपाणीAtul Bhosaleअतुल भोसले