‘नो काटा नो टपाल’ आमची भूमिका ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:02+5:302021-08-12T04:26:02+5:30
सोलापूर : ज्याचा माल, त्याचा हमाल या आदेशाला अनुसरुन सोलापूर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथील बाजार समितीमधील कांदा आडत ...

‘नो काटा नो टपाल’ आमची भूमिका ठाम
सोलापूर : ज्याचा माल, त्याचा हमाल या आदेशाला अनुसरुन सोलापूर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथील बाजार समितीमधील कांदा आडत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘नो काटा नो टपाल’ या भूमिोवर आम्ही ठाम असल्याची भूमिका सोलापूर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी मांडली.
ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर सर्व ट्रान्सपोर्ट बंद ठेवण्याची भूमिकेवरही आम्ही ठाम आहोत, असा इशराही त्यांनी दिला.
सोलापूर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते आणि सचिव प्रकाश अवसेकर यांनी सिद्धेश्वर कृषी बाजार समिती द्राक्ष भवन येथे बैठक घेतली. ज्याचा माल त्याचा हमाल याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी भूमिका त्यांनी याप्रसंगी मांडली. नो काटा, नो टपाल अशी भूमिकाही स्पष्ट केली.
यावेळी केंदार उंबरजे, राजन जाधव, वसीम इनामदार, बसवराज करजगी, सिद्धाराम मुनाळे, संजय मुनाळे, शिवानंद कोनापुरे, मुश्ताक चौधरी, संजय मुनाळे आदी व्यापारी उपस्थित होते.
-------
फोटो : १० ट्रान्सपोर्ट
सिद्धेश्वर बाजार समितीच्या कांदा आडत व्यापाऱ्यांशी संवाद साधताना उदयशंकर चाकोते. याप्रसंगी प्रकाश अवसेकर , वसीम इनामदार, बसवराज करजगीकर